सोनिया गांधींनी केला कंगणाचा रस्ता बिकट
X
अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी एरव्ही चर्चेत असायची. मात्र, आता भारतीय जनता पार्टीने तिला हिमाचलमधील मंडी जागेरुन लोकसभेची उमेदवारी दिल्याने राजकीय आखाड्यामध्येही आता ती चर्चेत आहे. या जागेवरुन तिला उमेदवारी दिल्याने एरव्ही अत्यंत दुर्लक्षित वाटणाऱ्या या जागेलाही विशेष महत्त्व आले आहे.
या जागेच्या निकालाला इतके महत्त्व का?
भाजपा अशा आविर्भावात होते की, मंडी लोकसभेची निवडणूक आपल्याला सहजपणे जिंकता येईल. कंगना रणौतची स्वत:ची असलेली लोकप्रियता आणि वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता ही दोन कारणे त्यांच्या आत्मविश्वासामागे होती. मात्र, आता स्वत: वीरभद्र सिंह यांचा मुलगाच तिच्याविरोधात या जागेवरून उभा आहे. त्यामुळे कंगना रणौतला तिच्या स्वत:च्या जोरावर आणि नरेंद्र मोदींच्या नावावर ही निवडणूक लढवावी लागणार आहे.
सोनिया गांधींच्या डावपेचांमुळे ‘मंडी’च्या निवडणुकीत चुरस
या सगळ्या प्रकरणामध्ये सोनिया गांधी यांनी स्वत:हून हस्तक्षेप केला. त्यांनी प्रतिभा सिंह यांच्यासोबत दोन खासगी बैठका घेतल्या, असे सांगितले जाते. पक्षाने स्वत:कडे पडती बाजू घेत मंडी लोकसभेची जागा त्यांच्या मुलाला देण्याचे कबूल केले. सोनिया गांधी यांनी अचानक केलेल्या या खेळीमुळे भाजपालाही आश्चर्याचा धक्का बसला आणि मंडी लोकसभेची निवडणूक अधिक चुरशीची झाली.