ऍक्टिव्हेट नसलेले अकाऊंट ट्विटर बंद करणार..
X
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अनेक दिवसांपासून ऍक्टिव्हेट नसलेले अकाऊंट बंद करणार आहे, कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांनी सोमवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की यामुळे अनेक वापरकर्त्यांच्या फॉलोअर्सची संख्या कमी होऊ शकते. आता नक्की यासाठी काय निकष असणार आहेत? मस्क हे नक्की कशासाठी करतायत? असं केल्यावर ट्विटरला काय फायदा होणार आहे? हे सर्व आपण अगदी २ मिनिटांमध्ये पाहणार आहोत...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अनेक दिवसांपासून ऍक्टिव्हेट नसलेले अकाऊंट बंद करणार असल्याची माहिती मस्क यांनी दिली पण ते कधीपर्यंत याबाबत त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. Twitter च्या धोरणानुसार, वापरकर्त्यांनी दर 30 दिवसांतून एकदा तरी त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करणे आवश्यक आहे. आता हा निकष जे पूर्ण करत नाहीत त्यांचं अकाउंट टाटा, बायबाय होणार हे आता नक्की..
ट्विटर 150 कोटी खाती हटवणार आहे..
याआधी मस्कने करोडो निष्क्रिय ट्विटर अकाऊंट काढून टाकण्याची घोषणा केली होती. मस्क यांनी 9 डिसेंबर 2022 रोजी एका ट्विटमध्ये लिहिले, 'ट्विटर लवकरच 1.5 अब्ज (150 कोटी) खात्यांच्या नावाची जागा मोकळी करण्यास सुरुवात करेल.' बाकी तुम्ही ट्विटरवर असाल आणि बरेच दिवस ते धूळ खात पडले असेल तर त्याला थोडं बघा नाही तर मस्क त्याचा शेवट करतील...