शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा...
X
जालना जिल्यातील पानशेंद्रा गावात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था च्या निवडणुकीच्या मतदाना दरम्यान शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार एकाच वेळी मतदान केंद्रा समोर आल्याने कार्यकर्त्यानी गोधळ घातला. यावेळी या ठिकाणी दगडफेक झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होत असताना दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि त्या नंतर आक्रमक खोतकर समर्थक गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समर्थकांनी केला.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून खोतकर आणि गोरंट्याल गटाला ही निवडणूक महत्वाची मानल्या जात आहे.त्यामुळे या दोन्ही गटाकडून या सोसायटीच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे,या निवडणुकीत शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांची सरळ लढत काँग्रेस आमदार केलास गोरंट्याल यांच्याशी असल्याने सोसायटी निवडणुकीत ही आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी या निवडणुकीला मोठी शिताफीने मतदार आपल्या कसं होईल साठी या दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
१३जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया दरम्यान ही बाचाबाची आणि दगडफेल झालीय, दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे.या राड्या नंतर या ठिकाणी संध्या शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडल्या जात आहे.दरम्यान अर्जुन खोतकर यांनी या राड्यावर प्रतिक्रिया देताना विरोधक ही निवडणूक पराभूत होणार असल्याने असले आरोप करत असल्याचं म्हंटल आहे.