Home > News > हे बाळ "शिवसेनेचं" महापौर किशोरी पेडणेकर

हे बाळ "शिवसेनेचं" महापौर किशोरी पेडणेकर

हे बाळ शिवसेनेचं महापौर किशोरी पेडणेकर
X

वरळी येथील घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या लहान मुलाला महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते कस्तुरबा रुग्णालयात आर्थिक मदत देण्यात आली. विष्णू पुरी असं या बाळाचं नाव असून उपचारादरम्यान त्याचा लहान भाऊ, आई आणि वडिलांचा मृत्यू झाला होता.

फक्त विष्णूला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. त्याच्यावर ५ ते ६ वेळा प्लॅस्टिक सर्जरी केली गेली. त्या मुलाला पुण्याला त्याच्या आजोळी ठेवलं जाणार असून त्याचा सर्व खर्च शिवसेना करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. यावेळी त्याला खाऊ, कपडे तसेच १५ लाखांची आर्थिक मदतही देण्यात आली.

Updated : 22 Feb 2022 6:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top