अहमदनगरच्या नव्या महापौरपदी सेनेच्या रोहिणी शेंडगे यांची निवड?
X
मुंबई: अहमदनगर महानगरपालिकाच्या महापौर-उपमहापौर पदासाठी अधिकृत निवडणूक बुधवारी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने,महापौर-उपमहापौर निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे आता केवळ औपचारिकता बाकी राहिली असून, बुधवारी अधिकृत निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे.
महाविकास आघाडी पॅटर्न
गेल्यावेळी शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देत सत्ता मिळवून दिली होती. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीच सरकार असल्याने, हाच पॅटर्न महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. राष्ट्रवादीसोबत आघाडी करत शिवसेनेला आपला महापौर बिनविरोध निवडून आणण्यात यश आले आहे.