Home > News > एक कडक लस्सी मारून भूर्रर..

एक कडक लस्सी मारून भूर्रर..

एकमेकांच्या भावना समजायला त्या व्यक्तच करायला हव्या किंवा जवळच असायला हवं असं अजिबात नाही. दुःखात, त्रासात असलेल्या मैत्रिणीला पुसटशीही कल्पना नसताना जेव्हा यशोमती ठाकूर स्वतः कसलाही विचार न करता धावून जातात आणि काही क्षणात काहीही न बोलता तिचा सर्व राग शांत करून टाकतात. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या स्वभावाची जाणीव करून देणारा एक अनुभव शीतल मेटकर वटाणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिला आहे नक्की वाचा..

एक कडक लस्सी मारून भूर्रर..
X

कोणत्यातरी मुद्यावरून डोकं सन् तापलेलं होतं, आणि नेमका तेंव्हाच तिचा फोन आला. आवाजावरून इकडच्या डोक्ष्याचं तापमान क्षणात तिकडे टिपल्या गेलं. आणि लगेच 'काय झालं?' असा आधाराचा सूर तिकडून निघून इकडे पोहोचला.

इकडच्या रागाला का कोण जाणे, पण अचानकच गहिवरून‌ आलं. आणि तो गहिवर सुद्धा पहिल्याच क्षणात तिकडे टिपल्या गेला..... आणि...

"थांब मी आलेच लगेच" म्हणत तिकडचा फोन बंद...

इकडून... "ओ..येऊ नको नं .. मी घरी नाही... आॅफिसमधे .."

तीथून पाच्चच मिनटात घरून फोन..

"हेलो आई..... कुठे आहे तू? .... मावशी आली घरी."

"अरे देवा..‌ आलीय का ही!"

"सर.. मी निघते बाॅ...... उरलेले कामं उद्या आता"

घरी पोहोचले... तर शांत चेहर्याने सोफ्यावर रिलॅक्स बसलेल्या तिने आधी घट्ट कवटाळून घेत जवळ बसवून‌ घेतलं आणि हातात हात घेऊन सवयीप्रमाणे तळहातावरचे अॅक्यूप्रेशर पाॅईंट्स दाबत काही वेळ शांत बसली.

आणि नंतर हळूच मुद्याला हात घालत.. "हम्‌...कशाचा राग?... अगं शांत रहात जा जरा..... असं स्वतःचं नुकसान नाही करून घ्यायचं बाई... तू असा त्रागा करून घेतल्यानी काय जग सेंसिबल होणार आहे का! ...... "

नंतर काही वेळ सोबत घालवून, थंडगार लस्सी घेऊन‌, परत एक कडक मिठी मारून आपल्या ताफ्यासहीत भुर्र....

नंतर आठवडाभर... व्यस्ततेतून वेळ काढून, रागावर नियंत्रण ठेवण्याचे quotes पाठवत दूरूनही सोबत राहणार्या दोस्तला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....

Updated : 17 May 2023 9:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top