Home > News > भाजप कार्यालयाबाहेर शर्मिला ठाकरे यांची गाडी? नक्की काय विषय आहे?

भाजप कार्यालयाबाहेर शर्मिला ठाकरे यांची गाडी? नक्की काय विषय आहे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची गाडी भाजप कार्यालयाबाहेर आढळून आल्यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

भाजप कार्यालयाबाहेर शर्मिला ठाकरे यांची गाडी?  नक्की काय विषय आहे?
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर ४ तारखेपासून लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठन करा असं देशभरातील हिंदु बांधवांना आवाहन केले. यामुळे राज्याचं राजकारण तापले असताना सध्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे यांची चर्चा आहे. आता राजकीय वर्तुळात जरी राज ठाकरे यांची चर्चा असली तरी समाजमाध्यमांवर मात्र राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची गाडी चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. तर काय झालं आहे की, शर्मिला ठाकरे यांची गाडी आज भाजपच्या कार्यालयाबाहेर दिसून आली. आता भाजपच्या कार्यालयाबाहेर त्यांची गाडी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कारण राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आहे त्यावरून राज ठाकरे हे भाजपमध्ये जाणार का? किंवा राज ठाकरे भाजप च्या सांगण्यावरून हे सर्व करत आहेत का? तसेच राज ठाकरे यांना हे सर्व करण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करत आहे अशा अनेक चर्चा सध्या महाराष्ट्रभर आहेत. आता आशा प्रकारच्या चर्चा सर्वत्र सुरू असताना शर्मिला ठाकरे यांची गाडी मुंबई येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर दिसून आल्यानंतर समाज माध्यमांवर चर्चेला उधाण आले आहे.

मर्सडीज या कंपनीची ही गाडी असून महाराष्ट्र. 46. जे. 0009 (MH 46 J 0009) असा या गाडीचा क्रमांक आहे. आता शर्मिला ठाकरे यांची गाडी भाजप कार्यालयाच्या बाहेर कशी काय? असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला असेल. ही गाडी भाजप कार्यालय बाहेर कोण घेऊन आलं? नक्की या गाडीतून कोण आले आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आता निर्माण झाले असतील.

त्याबाबतची सत्यता काय आहे?

शर्मिला ठाकरे यांची गाडी भाजप कार्यालयाच्या बाहेर कशी यामुळे लोकांच्या भुवया आश्चर्याने वरती गेल्या होत्या. मात्र या मागची सत्यता काही वेगळे आहे. तर गाडी शर्मिला ठाकरे यांच्याकडून सतीश कोठावळे यांनी खरेदी केलेली आहे. सतीश कोठावळे ज्यांनी ही गाडी विकत घेतली आहे. त्यांनी ही गाडी भाजप कार्यालयाच्या समोर लावल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. त्यांनी ही गाडी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडून विकत घेतली असून आता ती गाडी सतीश कोठावळे यांच्या नावावरती करण्यासाठी आरटीओकडे कागदपत्रे दिली असल्याचे कोठावळे यांनी सांगितले. कोठावळे यांनी ही गाडी 14 एप्रिल रोजी खरेदी केले आहे.

Updated : 3 May 2022 7:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top