''मंत्रिमंडळाचा विस्तरा करताना सर्वात आधी..'' मनसे नेत्या शालिनी ठाकरेंचे ट्विट
X
नंदुरबार जिल्ह्यात अडीच वर्षात 9 हजार 600 बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली यामध्ये विशेष बाब म्हणजे यातील 2 हजार 365 मुलींवर अठरा वर्षाच्या आतच मातृत्व लादण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट ''करत मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या आरोग्य सुविधांसाठी दरवर्षी शेकडो कोट्यावधी रूपयांची तरतूद होते मग हा निधी जातो कुठं?'' असा प्रश्न उपस्थित केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या बालविवाहाची माहिती समोर आल्यानंतर खरंतर अनेकांच्या आश्चर्याचा धक्का बसला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे तर अनेकांनी तर अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ''नंदुरबार जिल्ह्यात अडीच वर्षात ९,६०० बालविवाह झाले! त्यातल्या २,३६५ मुलींवर अठरा वर्षांच्या आतच मातृत्व लादण्यात आले!! मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्य सुविधांसाठी दरवर्षी शेकडो कोट्यवधी रुपयांची तरतूद होते. मग हा निधी जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित केला आहे
नंदुरबार जिल्ह्यात अडीच वर्षात ९,६०० बालविवाह झाले! त्यातल्या २,३६५ मुलींवर अठरा वर्षांच्या आतच मातृत्व लादण्यात आले!! मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्य सुविधांसाठी दरवर्षी शेकडो कोट्यवधी रुपयांची तरतूद होते. मग हा निधी जातो कुठे? pic.twitter.com/F45iZNi7cS
— Shalini Thackeray (@ThakareShalini) August 4, 2022
इतकंच नाही तर त्यांनी हा प्रश उपस्थित करत त्यांनी सध्या राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सर्वात आधी महिला व बालविकास विभागाच्या मंत्रीपदी योग्य महिला नेतृत्वाची निवड करण्याची सुद्धा विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यांनी म्हंटल आहे की, ''सध्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला मंत्रालयात महिला व बालविकास मंत्रीच नाहीनंदुरबारचा धडा घेत शिंदे-फडणवीस सरकारने स्वतः च्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सर्वात आधी, खरंतर आजच महिला व बालविकास विभागाच्या मंत्रीपदी योग्य महिला नेतृत्वाची निवड करावी.''
सध्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला मंत्रालयात महिला व बालविकास मंत्रीच नाहीनंदुरबारचा धडा घेत शिंदे-फडणवीस सरकारने स्वतः च्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सर्वात आधी, खरंतर आजच महिला व बालविकास विभागाच्या मंत्रीपदी योग्य महिला नेतृत्वाची निवड करावी.@CMOMaharashtra @mieknathshinde
— Shalini Thackeray (@ThakareShalini) August 4, 2022