"रुपाली ठोंबरेंनी मनसे का सोडली" शालिनी ठाकरेंचा खुलासा..
X
गेल्या महिनाभरापासून मनसेने भोंग्यांचा विषय उचलून धरला आहे. १ मेला औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केलं. या भाषणात त्यांनी राज्य सरकारला ३ मे नंतर सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचा अल्टीमेटम दिला होता. यानंतर बुधवारी राज्यभरामध्ये मनसैनिकांनी अजानविरूध्द हनुमान चालिसा असं आंदोलन केलं. या सगळ्यावर आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला अध्यक्ष शालिनी ठाकरे यांच्याशी बातचित केली आहे. ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला तुमच्या फेसबुक आणि युट्युब चॅनलवर पाहायला मिळेल. या मुलाखती दरम्यान मनसेच्या पूर्व पदाधिकारी व आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसे पक्ष का सोडला यासंदर्भातील शालिनी ठाकरे यांनी खुलासा केला आहे.
त्यांना रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसे पक्ष का सोडला? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, रुपाली पाटील ज्या ठिकाणी काम करत आहेत तिथला म्हणजेच पुण्याचा माझा फारसा संपर्क नाही. परंतु मला असं वाटतंय कि, त्यांचे वेळोवेळी राज साहेबांशी बोलणं होतं. त्या कधीही पक्षाच्यावतीने ज्यावेळी मत व्यक्त करायच्या त्या वेळी त्या नक्की राज साहेबांशी बोलून करत होत्या. पण आता शेवटी सर्वांना एक महत्त्वाकांक्षा असते त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून त्यांची महत्त्वाकांक्षा दुसऱ्या पक्षांमध्ये पूर्ण होईल असं वाटलं असेल म्हणून त्यांनी मनसे पक्ष सोडला असल्याचा माझा समज असल्याचं शालिनी ठाकरे यांनी म्हंटल आहे.