Sulochana Latkar | ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचं निधन...
X
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींची प्रकृती चिंताजनक होती. त्या दादार येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दम्यान त्यांचा प्राणज्योत मावळली.
वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक हिंदी मराठी चित्रपटात त्यांनी काम केल. तब्बल ४०० सिनेमांमध्ये अभिनयाची सुलोचना दीदींनी भूमिका बजावली होती.
सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर.. कोल्हापूरमधल्या खडवलट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला.. 250 हून अधिक मराठी आणि 150 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.. तंबूतल्या चित्रपटानं सुलोचना दीदींना चित्रपटांची ओढ निर्माण केली. 'जय भवानी' या सिनेमातून सुलोचना दीदी नायिका म्हणून समोर आल्या. होत्या तर 'मराठा तितुका मेळवावा' या सिनेमातल्या जिजाऊंच्या भूमिकेमुळे सुलोचना दीदींचं वेगळं रुप समोर आलं. त्याशिवाय वहिनीच्या बांगड्या, भाऊबीज, बाळा जोजो रे, चिमणी पाखरं, प्रपंच, स्त्री जन्मा तुझी ही कहाणी, पारिजातक हे दीदींचे तुफान गाजलेले चित्रपट. मोलकरीण आणि एकटी या सिनेमात दीदींनी साकारलेली सोशिक आईची भूमिका म्हणजे केवळ लाजवाब..मराठीप्रमाणेच हिंदी पडदाही सुलोचना दीदींनी गाजवला. सुलोचना दीदींना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.