ग्रोसरी विकता विकता ऍमेझॉन विकू लागलं गांजा, पोलिसांनी केला पर्दाफाश!
X
मध्य प्रदेशातील भिंडमध्ये पोलिसांनी ऑनलाइन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध असलेली अमेझॉनवर ई-कॉमर्स कंपनीद्वारे कढीपत्ता विक्रीच्या नावाखाळी गांजाच्या तस्करी केली जात होती. त्यामुळे या घटनेने खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेली ई-कॉमर्स कंपनीद्वारे चक्क गांजाच्या तस्करी करण्यात येत असल्याचे समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. प्रदेशातील भिंडमध्ये पोलिसांनी शनिवारी ऑनलाइन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून टोळीच्या दोन सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त केला आहे.
यातील आरोपीने विशाखापट्टणम येथे बनावट पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांकासह ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर कढीपत्ता विकण्यासाठी आपल्या फर्मची नोंदणी केली होती. याद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा आयात केला जात होता.