राणा दांपत्यामुळे हनुमान चालिसेचाच अपमान, सक्षणा सलगर गरजल्या
X
शनिवारी 23 एप्रिल ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेची सांगता सभा पार पडली. या सर्वांमध्ये सक्षणा सलगर यांनी त्यातील भाषण केलं. इस्लामपूर मधील त्यांच्या भाषणानंतर कोल्हापूरच्या सभेत त्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यांचे भाषण लेखी स्वरुपात जसंच्या तसं.....
मला आपल्या सगळ्यांशी बोलताना आनंद वाटतोय कारण राष्ट्रवादीच्या स्टेजवर सगळे बहुजनांची लेकर आहेत. युवकांचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख अल्पसंख्यांक समाजाचा मुलगा आहे. सहा जण बसू शकतील इतकी ही जागा घरात उपलब्ध नाही असा तरुण आज राष्ट्रवादी पक्षाचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. आमच्या सुनील गव्हाणे एक सुरक्षारक्षकाचा मुलगा आहे विद्यार्थ्यांचा अध्यक्ष आहे.
कोल्हापूरकरांचं विशेष अभिनंदन करावंसं वाटतं. कारण त्यांनी ताराराणी भोसले यांचा आदर्श जपला, म्हणून जयश्री जाधव आज विधानसभेत जाऊ शकल्या. दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी उमेदवार जयश्री जाधव यांची टिंगलटवाळी भाजपनं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली त्याचं खंडन करण्यासाठी आम्हाला सांगावे लागत आहे. कोल्हापूरची जनता खऱ्या अर्थाने शाहू, फुले, आंबेडकर हा विचार स्वतःच्या कृतीतून जपते याचा मला अभिमान आहे. आज महाराष्ट्र मध्ये तुम्ही पाहत आहे, एक वेगळाच भंपकपणा सुरू आहे. शेतामध्ये जशी बुजगावणी असतात तशीच बुजगावणी आज तुम्ही मुंबईत पाहिली असतील. बंटी बबली नावाची बुजगावणी अमरावती चे खासदार आणि आमदार आहेत. खासदाराने खासदारा सारखाच वागावं. आमच्या सुप्रियाताईंसारखं संसदपटू म्हणून या ना मैदानात..
मुंबईत या जोडगोळीने जो राडा घातलाय त्यामुळे तुलसीदास रचित हनुमान चालिसेचाच अपमान झाला आहे. काही करायचं असेल तर पुष्पा मधल्या सामी गाण्यावर डान्स करायचा होता. मॅडम सामी गाण्यावर डान्स केला असतात तर ठरवलेला पानसुपारीचा कार्यक्रम देखील पार पडला असता आणि वाजवायला भाजपवाले होतेच. प्रवीण दरेकर मुंबईतच होते. त्यांचा आहे तो अजेंडा आहे तो आपण हाणून पाडला पाहिजे. शरद पवार यांच्या घरी हल्ला होतो. बुजगावण्यांना समोर करून महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घालतात हे लोक... शरद पवार जर उत्तर देणार नसतील तर आम्ही जिवंत आहोत, आम्ही उत्तर देऊ.
लहरो को खामोश देखकर समंदर की रवानगी न समज ले ना, हम तुफान है, जब भी उठेंगे तेरा कारवा तबाह हो जायेगा। शरद पवारांवर जर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी पुन्हा मागे फिरून तुमच्यावरच पडेल कारण शरद पवार म्हणजे आभाळ आहेत. त्यामुळे तसा प्रयत्न तुम्ही करू नका. ही संकल्प सभा आहे त्यामुळे मी संकल्प करते की 2024 मध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या ही शंभरच्या वर असेल शरद पवारांच्या खांद्यांवरील जबाबदारी आपण तरुणांनी घेतली पाहिजे आपण पुढे आले पाहिजे.