समृद्धी महामार्गावर चालकाला येणाऱ्या झोपेवर रामबाण उपाय...
X
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत या महामार्गावर अनेक अपघात झाले, अनेकांचे जीव गेले हा महामार्ग जणू मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावर होणाऱ्या अपघातामुळे सर्वजणच चिंतेत होते. पण आता हेच अपघात रोखण्यासाठी एमएसआरडीसीने काही उपाययोजना केल्या आहेत. तर आता समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी नक्की काय करण्यात आलं आहे पाहुयात...
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रम्बल स्ट्रीप्स बसवण्यात येत आहे. गाडी चालवताना चालकाला झोप येऊ नये म्हणून एमएसआरडीसीने प्रत्येक 25 किलोमीटरवर हे रम्बल स्ट्रीप्स बसविण्याचे काम सुरू केले आहे. गंगापूर, वैजापूर तालुक्याच्या हद्दीत हे काम सुरू झाले आहे. रात्री प्रवास करणाऱ्यांना पुलावरील कठडे दिसावेत म्हणून रेडियमही लावण्यात येत आहे. तर महामार्गावर वाहनं कशी चालवावी याबाबत टोल नाक्यावर चालकांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सूचना देण्यात येणार आहेत. आता समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी या उपाययोजना किती उपयोगी पडतात पहावा लागेल...