आशिया खंडातील पहिला मिस वर्ल्ड किताब जिंकलेली रीटा फारिया पॉवेल कोण आहे तुम्हाला माहीत आहे का?
X
भारताच्या रीटा फारिया पॉवेलने १७ नोव्हेंबर १९६६ रोजी मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. ही कामगिरी करणारी ती भारत आणि आशिया खंडातील पहिली महिला ठरली. ती पहिली मिस वर्ल्ड होती जी पेशाने डॉक्टर होती. यानंतर आजपर्यंत भारतातून 6 जागतिक सौंदर्यवती झाल्या. 23 ऑगस्ट 1943 रोजी मुंबईत जन्मलेल्या रिटाने वयाच्या 23 व्या वर्षी हे विजेतेपद मिळवले.
रिटाचे आई-वडील गोव्याचे रहिवासी होते. विजेतेपद जिंकल्यानंतर, तिने एक वर्ष मॉडेलिंग केले, परंतु नंतर तीने हे क्षेत्र सोडले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेटजी जिजाबाई ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती लंडनमधील किंग्ज कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेली. 1971 मध्ये डेव्हिड पॉलसोबत तिचा विवाह झाला झाला. ती सध्या तिच्या पतीसोबत डब्लिन, आयर्लंड येथे राहते. त्याला दोन मुलगे आहेत.