Malala Yousafzai : हिजाबच्या वादात मलालाची उडी..
X
कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने मोठे वक्तव्य केले आहे. मुस्लीम मुलींना हिजाब घालून कॉलेजमध्ये जाण्यापासून रोखणे हे भयंकर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मलालाने ट्विट करत म्हंटले आहे की, "कॉलेज आम्हाला अभ्यास व हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना हिजाब घालून शाळेत जाऊ देण्यास नकार देणे भयंकर आहे. कमी किंवा जास्त कपडे परिधान केल्याबद्दल स्त्रियांवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लीम महिलांचे दुर्लक्ष थांबवले पाहिजे.'' असं ट्विट त्यांनी केलं आहे.
हिजब वाद कसा चिघळला?
शाळा-महाविद्यालयांमधील दोन गटांतील वाद अधिकच चिघळला आहे. कर्नाटक राज्यातील एका कॉलेजमध्ये मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्याच्या मुद्द्यावरून धार्मिक तणाव वाढला आहे. मुस्लिम विद्यार्थीनी कॉलेजमध्ये हिजाब घालून येत असल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी भगवा पंचा आणि भगव्या रंगाची शाल पांघरून कॉलेजमध्ये प्रवेश करायला सुरूवात केली. त्यावरून सुरू झालेल्या वादातून मोठा तणाव निर्माण झाला आहे. तर त्यानंतर कॉलेजने मुस्लिम विद्यार्थीनींच्या हिजाबला बंदी घातल्याने धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यापार्श्वभुमीवर राज्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. तर या धार्मिक तणावाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे.
कर्नाटक राज्यातील कॉलेजमध्ये सुरू झालेल्या हिजाब वादाने हिंसक वळण घेतले आहे. तर शिवमोगा आणि बागलकोट जिल्ह्यात दगडफेकीच्याही घटना देखील काल घडल्या आहेत. मात्र पोलिसांनी कारवाई करत जमावाला पांघवण्यात यश मिळवले. दरम्यान हिजाब घातलेल्या मुलीला भगव्या शाल घेतलेल्या काही मुलांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. यावेळी भगव्या शाली पांघरलेल्या मुलांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावेळी हिजाब परिधाण केलेल्या मुलीने अल्लाहू अकबर च्या घोषणा दिल्या. यावरून कर्नाटकमध्ये हिजाबवरून पेटलेला वाद चिघळला आहे.