'वीज बिल वसुली करा पण इंग्रजां सारखे वागू नका' यशोमती ठाकूर यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
X
शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली करताना सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवा इंग्रजांना सारखे वागू नका असा सज्जड इशारा महिला व बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. शुक्रवारी अमरावतीत विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत प्रसंगी त्यांची कानउघाडणीही ठाकूर यांनी केली.
अमरावतीतील शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सर्व रक्कम भरण्याचा तगादा अधिकार्यांकडून लावला जातो, तसेच शेतकर्यांची वीज जोडणी कापली जाते अशा अनेक तक्रारी पालकमंत्री ठाकूर यांच्याकडे आल्या होत्या. याचा पाठपुरावा करताना कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्यांकडून जी असेल ती रक्कम स्वीकारा ऊर्जा विभागावर ताण येतो आहे याची माहिती आहे मात्र, वीजबिल वसुली करताना शेतकऱ्यांसाठी इंग्रज आणि सारखे वागू नका शक्य तितक्या नर्मा इथे प्रक्रिया पार पाडा अशा सूचना ठाकूर यांनी यावेळी वीज विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान,अमरावती विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांची ठाकूर यांनी चांगलीच कान उघाडणी केली.
तसेच अमरावती विभागीय क्रीडा संकुलात नेमलेल्या प्रशिक्षकांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत परस्पर नेमणुका केल्यामुळे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विभागीय क्रीडा संकुल यामध्ये कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा असू नये तसेच खेळांमध्ये कोणत्याही पद्धतीचे राजकारण आणू नये अशा पद्धतीचा सूचना आणि आदेश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले आहेत. अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार न करता खेळाच्या आणि खेळाडूंच्या हिताचा विचार करून विभागीय संकुलामध्ये कारभार करावा अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल असा इशाराही ठाकूर यांनी यावेळी दिला. तसेच याचवेळी अधिकारी जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांनाही न जुमानता कारभार करीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.