Home > News > Realince Foundation महिलांना डिजीटल दुनियेत सक्षम करण्यासाठी करणार हा उपक्रम

Realince Foundation महिलांना डिजीटल दुनियेत सक्षम करण्यासाठी करणार हा उपक्रम

महिलांचे डिजिटल क्षेत्रात असलेले अल्प प्रमाण लक्ष्यात घेत. Realince Foundation ने डिजिटल क्षेत्रात जेंडर डिजिटल डिव्हाईड भरून काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी 'या' 10 संस्थांची निवड करण्यात आली आहे.

Realince Foundation महिलांना डिजीटल दुनियेत सक्षम करण्यासाठी करणार हा उपक्रम
X

रिलायन्स फाऊंडेशन (Realince Foundation) आणि यूएस-एड (US-AID) या संस्थांनी एकत्रित येत वूमन कनेक्ट चॅलेंज इंडिया (Woman Connect Chalang India) या नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत दहा संस्था- संघटनांची निवड करण्यात आली असून या संघटनांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. भारतात डिजिटल क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापरात स्त्रियांचा विचार केला असता. स्त्रियांचे प्रमाण हे खूप कमी आहे. त्यामुळे Gender Digital Divid भरून काढण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत ज्या संस्थांची निवड करण्यात आली आहे त्या संस्थांना 15 लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच 11 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये रिलायंस फाउंडेशन ने 8.5 कोटी इतक्या रूपयांचे आर्थिक सहाय्यक केला आहे. या उपक्रमाअंतर्गत देशातील 17 राज्यातील जवळपास तीन लाखांहून अधिक महिला आणि मुलींना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आर्थिक सबलीकरण वाढवण्यास मदत होईल अस रिलायन्स फाऊंडेशन म्हंटल आहे.

या उपक्रमाविषयी माहिती देताना रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी ( Neeta Ambani ) यांनी सांगितले की, महिलांचे सबलीकरण हे प्रत्येक क्षेत्रात व्हावे हे उद्देशाने रिलायन्सने जिओ ( Realince Jio ) लॉन्च केले होते. जिओच्या मद्यमातून डिजिटल क्रांती झाली. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हे जिओ च्या माध्यमातून सर्व देशभर शक्य झाले. त्यानंतर आता भारतात असलेला जेंडर डिजिटल डिव्हाइड भरून काढण्यासाठी रिलायंस फाउंडेशन आणि यूएस-एड सोबत काम करत आहे. या माध्यमातून वुमन कनेक्ट चॅलेंज इंडिया ( Woman Connect Challenge ) उपक्रम राबवला जात आहे. यासाठी 10 संस्थांची निधी देण्यासाठी निवड झाली आहे. या संस्थांचे अभिनंदन आणि परिवर्तनाच्या प्रवासाच्या वाटेवर स्वागत असे म्हंटल आहे.

महिलांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सबंध करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधून काढणाऱ्या प्रकल्पांना हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. अनुदीप फाउंडेशन, बेअरफूट कॉलेज इंटरनॅशनल, सेंटर फॉर यूथ अँड सोशल डेव्हलपमेंट, फ्रेंड्स ऑफ वूमन्स वर्ल्ड बँकिंग, नांदी फाउंडेशन, प्रोफेशन असिस्टंस फॉर डेव्हलपमेंट अॅक्शन, सोसायटी फॉर डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्हज, सॉलिडारिडाड रीजनल एक्स्पर्टाइज सेंटर, टीएनएस इंडिया फाउंडेशन आणि झेडएमक्यू डेव्हलपमेंट या 10 संस्थांची या उपक्रमासाठी प्रथम निधी देण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

Woman Connect Challenge India हा उपक्रम काय आहे?

या उपक्रमाची सुरुवात 2020 मध्ये करण्यात आली.

जानेवारी 2021 मध्ये यूएस-एड आणि रिलायन्स फाउंडेशनने सॉल्व्हर्स सिम्पोझियमचे आयोजन करण्यात आले होते.

रिलायन्स फाउंडेशनने सॉल्व्हर्स सिम्पोझियम मध्ये सेमी-फायनलिस्ट संस्था आणि तज्ज्ञ एकत्र आले होते. तेव्हा जेंडर डिजिटल डिव्हाइडबद्दल चर्चा करण्यात आली होती.

या वर्षी या उपक्रमासाठी दहा संस्थांची निवड करण्यात आली असून 180 हून अधिक अर्जामधून या निवडक दहा संस्थांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या प्रत्येक संस्थेसाठी 12ते 15 महिन्यांच्या कालावधीसाठी 75 लाख रुपये ते एक कोटी रुपयांपर्यंतचा निधी दिला जाणार आहे.

डिजिटल विश्वातील महिलांची दरी भरून काढण्यासाठी रिलायन्सचा हा प्रयत्न असनार आहे.

रिलायन्स जिओच्या माध्यमातून 1.3 अब्ज भारतीयांपर्यंत इंटरनेट सेवा पोहचली आहे.

2017मध्ये भारतातल्या केवळ 19 टक्के महिला मोबाइल इंटरनेटबद्दल वापरत होत्या ते आता 2020 मध्ये 53 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 67 टक्के महिलांकडे आता स्वतःचा मोबाइल फोन आहे.

तर अशाप्रकारे या उपक्रमा अंतर्गत महिलांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी ( Women Empowerment ) जागतिक पातळीवरून उपाययोजना करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

Updated : 30 Sept 2021 9:42 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top