नोकरीची संधी, ३ लाखांहून अधिक पगार..
X
आज शिकलेली मुलं नोकरीविना घरात बसून आहेत. अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. शिकलेल्या मुलांची ही अवस्था असेल तर कमी शिकलेल्या मुलांचं काय? हा फार मोठा प्रश्न आहे. अनेक मुलं सरकारी नोकरी पाहिजे म्हणून कितीतरी वर्ष अभ्यास करत असलेली तुम्ही पहिली असाल.. काय करणार कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की, १०० जागांसाठी भरती असेल तर लाखो फॉर्म येतात.. अशी सर्व परिस्थिती आहे.. तर नोकरीच्या शोधत असलेल्या काही मुला-मुलींना आता काही संधी आहेत का? कुठे नवीन ओपनिंग आहेत का? तर होय आहेत अगदी १० पास असलेल्या मुलाला देखील RBI मध्ये नोकरीची संधी आहे.. यासोबतच आणखीन काही नोकरीच्या संधी आहेत का ते देखील पाहुयात..
सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी, आम्ही काही नवीनतम सरकारी नोकऱ्यांची माहिती घेऊन आलो आहोत. RBI मध्ये 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी 25 पदांसाठी भरती निघाली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली आहे. निवड केल्यावर, तुम्हाला २४० दिवसांसाठी दररोज २००० रुपये मिळतील. त्याच वेळी, बीएसएफमध्ये 1348 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये निवड केल्यावर तुम्हाला ६९ हजार पगार मिळेल.
पदवीधर उमेदवारांसाठी काही नोकऱ्यांची संधी आहे का?
१ : कृषी कल्याण मंत्रालयात कृषी शास्त्रज्ञ पदांसाठी १९५ जागा आहेत. निवड झाल्यावर तुम्हाला 56 हजार ते 1.7 लाख रुपये पगार मिळेल.
२ ; BSNL ने अप्रेंटिस पदासाठी 40 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. निवड दस्तऐवज पडताळणी आणि गुणवत्तेवर आधारित असेल.
३ ; UPPSC ने सब रजिस्ट्रारसह 173 पदांची भरती केली आहे. 21 ते 40 वयोगटातील पदवीधर विद्यार्थी या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. निवड झाल्यावर तुम्हाला 1.5 ते 3.5 लाख रुपये पगार मिळेल.