Home > News > लोकहो तुमचे कान तृप्त करण्यासाठी येतय राणू मंडल यांचं आणखी एक गाणं

लोकहो तुमचे कान तृप्त करण्यासाठी येतय राणू मंडल यांचं आणखी एक गाणं

लोकहो तुमचे कान तृप्त करण्यासाठी येतय राणू मंडल यांचं आणखी एक गाणं
X

एका रात्रीतून प्रसिद्धीझोतात आलेल्या रानू मंडल यांना बॉलिवूडमध्ये आणखी एक संधी मिळाली आहे. सरोजिनी नायडू यांच्या जीवनावर आधारित एक नवा चित्रपट येत असून या चित्रपटातील एक गाणे रानू मंडल गाणार असल्याची माहिती 'रामायण' फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी "धीरज मिश्रा यांनी लिहिलेले 'सरोजिनी' या चित्रपटाचे हे गाणे रानू मंडल यांच्या आवाजात रेकॉर्ड केले जाणार आहे. तसेच, दीपिका यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी रानू मंडल धीरज मिश्रासोबत काम करणार असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीमध्ये रानू मंडल यांनी गाण्याच्या काही ओळी गात, तुम्ही मला जे प्रेम आणि आदर आधी दिला. तसेच, यावेळीही द्याल, अशी आशा' असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


दरम्यान, रानू मंडल यांचा पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवरील गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर गायक हिमेश रेशमियाने रानू मंडल यांना चित्रपटात गाण्याची संधी दिली होती. रानू यांचे पहिले गाणे 'तेरी मेरी कहाणी' प्रदर्शित झाल्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांच्या चाहत्या वर्गातही वाढ झाली आहे.

Updated : 13 Nov 2020 5:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top