Home > News > Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघाले.. नवे राज्यपाल कोण?

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघाले.. नवे राज्यपाल कोण?

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघाले.. नवे राज्यपाल कोण?
X

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 12 राज्यांमध्ये राज्यपाल आणि नायब राज्यपाल बदलण्यात आले आहेत. भगतसिंग कोश्यारी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमित शहा यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

कोणत्या-कोणत्या राज्यांमध्ये राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर बदलण्यात आले आहेत पहा..

1. लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाइक (राज्यपाल अरुणाचल प्रदेश)

2. लक्ष्मण प्रसाद आचार्य (राज्यपाल सिक्किम)

3. सीपी राधाकृष्णन (राज्यपाल झारखंड)

4. गुलाब चंद कटारिया (राज्यपाल असम)

5. शिव प्रताप शुक्ला (राज्यपाल हिमाचल प्रदेश)

6. रिटायर्ड ब्रिगेडियर डॉ. बीडी मिश्रा (उप-राज्यपाल लद्दाख)

7. जस्टिस एस अब्दुल नजीर (राज्यपाल आंध्र प्रदेश)

8. एलए गणेशन (राज्यपाल नगालैंड)

9. फागू चौहान (राज्यपाल मेघालय)

10. राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर (राज्यपाल बिहार)

11. बिस्वा भूषण हरिचंदन (राज्यपाल छत्तीसगढ़)

12. अनुसुइया उइके (राज्यपाल मणिपुर)

कोश्यारी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर वादात सापडले होते..

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ६ डिसेंबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पदावर कायम राहायचे की नाही, असा प्रश्न त्यांनी गृहमंत्र्यांना विचारला होता. १९ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथील विद्यापीठाच्या कार्यक्रमात कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांना जुन्या काळातील प्रतीक म्हटले होते. कोश्यारी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषयांबद्दल अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्या विरोराधात राज्यात अनेक आंदोलने झाली. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. विरोधकांनी देखील त्यांच्या राजीनामा घेण्याची मागणी केली होती. राज्यात त्यांच्या विरोधात असलेल्या वातावरणामुळे त्यांनी देखील राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते. आज अखेर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती यांनी मंजूर केला आहे.

Updated : 12 Feb 2023 10:37 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top