Home > News > "दुसर्‍याचे कपड़े कमी करण्यापेक्षा... " ट्रोलर्सला शालूचे शालजोडे

"दुसर्‍याचे कपड़े कमी करण्यापेक्षा... " ट्रोलर्सला शालूचे शालजोडे

दुसर्‍याचे कपड़े कमी करण्यापेक्षा...  ट्रोलर्सला शालूचे शालजोडे
X

मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) गाजलेल्या 'फँड्री' (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच समाजमाध्यमावर सक्रिय असते. त्या नेहमीच त्यांचे व्हिडिओज व फोटो समाजमाध्यमावर शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचे मोठे फॅनफॉलोअर्स आहेत.



नुकताच त्यांनी त्यांचा एक फोटो समाजमाध्यमावर शेअर केला. नेहमीप्रमाणे त्यांच्या फोटोवरती चाहत्यांच्या कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे. परंतु त्यातीलच एक निलेश लाडके या सोशल मीडिया वापरकर्त्याने त्यांच्या फोटोवर एक कमेंट केली आणि त्यानंतर मात्र राजेश्वरी खरात यांनी त्याला चांगलाच धडा शिकवत झापले आहे.

त्यांनी शेअर केलेल्या फोटो वरती निलेश लाडके यांनी कमेंट केली त्यामध्ये त्यांनी "राजेश्वरी कमी कपड्यात फोटो शूट करत जा जास्त लाईक कमेंट भेटणं... कारण येवढे पीक फेसबुकवर पोस्ट करते तर काय समजू" आशा प्रकारे कॉमेंट केलेल्या या निलेश लाडके या social media वापरकर्त्याला अभिनेत्री राजेश्वरी खरात यांनी चांगलंच उत्तर देत झापले आहे.



राजेश्वरी खरात यांनी त्यांना उत्तर देताना म्हंटल आहे की, Nilesh Ladke, महाराजांचा फोटो प्रोफाईल ला ठेऊन कोणाशी काय बोलावे याचे भान कृपया आपण ठेवा. तुमच्यासारखे लोक आयुष्यात काही करू शकत नाही आणि इथे social media सारख्या ठिकाणी बाकीच्यांना बदनाम करायला येतात. एका police complaint मध्ये तर सरळ होता तुम्ही, मग एवढा शहाणपणा कशासाठी?? दुसर्‍याचे कपड़े कमी करण्यापेक्षा आपल्या आई बहिणीला चांगलं सुखी आयुष्य द्या .. आज तुमच्यासारख्यांची हिम्मत किती वाढली आहे, देव न करो पण कर्माचे फळ भोगावी प्रत्येकाला लागतात तेव्हा विचार करून बोला इथुन पुढे. अस म्हणत त्याला त्यांनी चांगलीच समज दिली आहे.





Updated : 11 Nov 2021 8:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top