राज कुंद्राप्रकरणी शिल्पा शेट्टीने अखेर मौन सोडले, म्हणाली...
X
पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर शिल्पा शेट्टीलाही या प्रकरणात अजूनही क्लीन चिट मिळालेली नाही. त्यामुळे शेवटी शिल्पा शेट्टीने संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक चिठ्ठी लिहिली आहे. ज्यात तिने आपली बाजी मांडली आहे.
आपल्या नोटमध्ये शिल्पा शेट्टीने लिहिले आहे की, 'होय, गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक घडामोड माझ्यासाठी आव्हानात्मक होती. अनेक अफवा आणि आरोप करण्यात आले आहेत. माध्यमांनी माझ्यावर आणि माझ्या चाहत्यांवर चिखलफेक केली आहे. केवळ मीच नाही तर माझ्या कुटुंबातील सदस्यांवर सुद्धा कमेंट आणि ट्रोल करण्यात आले. माझी भूमिका स्पष्ट आहे, मी कोणतेही प्रत्युत्तर देणार नाही कारण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असं शिल्पा शेट्टीनं म्हंटले आहे.
शिल्पा शेट्टी पुढे लिहताना म्हणाली की, 'माझ्या बाजूने कोणतेही खोटे विधान प्रकाशित करू नका. मी विचार करत आहे की एक सेलिब्रिटी असल्याने आपण कोणतेही तक्रार करू नये किंवा कोणालाही स्पष्टीकरण देऊ नये. मी एवढेच म्हणेन की सद्या तपास चालू आहे. अशा परिस्थितीत माझा मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कुटुंब म्हणून, आम्ही निश्चितपणे सर्व कायदेशीर मदत घेऊ. पण तोपर्यंत माझ्या मुलांचा विचार करून, कोणतीही अपूर्ण बातमी तपासल्याशिवाय प्रकाशित करू नका, अशी विनंती सुद्धा शिल्पा शेट्टीकडून करण्यात आली आहे.
My statement. pic.twitter.com/AAHb2STNNh
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) August 2, 2021
शिल्पा शेट्टीने पोस्टच्या शेवटी लिहिले की, 'मी अभिमानाने सांगू शकतो की मी कायद्याचे पालन करणारी नागरिक आहे. मी गेली 29 वर्षे खूप मेहनत घेत आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कोणाचा विश्वास मोडणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी माझ्या कुटुंबाच्या वतीने विनंती करते की माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्राइवसीच्या अधिकाराचा सन्मान करा. आम्ही मीडिया ट्रायलसाठी पात्र नाही. कायद्याला आपलं काम करू द्या. सत्यमेव जयते!'