महीलांसाठी `लोकल`सेवाअद्याप लटकलेलीच
X
उपनगरीय लोकल मधून सर्वच महिलांना शनिवार पासून परवानगी देण्यात आली होती. त्याची नियमावली ठरविन्यावरुन सद्या रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार मध्ये चांगलीच जुंपली आहे. सोमवारी पश्चिम रेल्वेने प्रसिद्धपञक काढून वाढीव प्रवाशांना लोकल प्रवास देण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले . परंतू कोरोनाकाळात प्रवासा बाबत कार्यपद्धती, रूपरेषा निच्चित होणे गरजेच असून हे राज्य सरकार ठरवणार आहे आणि राज्य सरकारकडून यावी अशी प्रतिक्षा असल्याचेही रेल्वे प्रशासन म्हटले आहे. त्यामूळे सर्वच महिलांच्या लोकल प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .
सर्व महिलांना १६ ऑक्टोबर रोजी रेल्वे प्रवास खूला करण्यात आला असे पत्र राज्य सरकार तर्फे प्रसिद्द करण्यात आले होते. आणि त्याच दिवशी रेल्वे प्रशासना कडून त्याच उत्तर देण्यात आल.हा प्रवास देण्यासाठी रेल्वे प्रशासन तयार आहे. सद्या पश्चिम रेल्वे ७०० फे-या आणि गर्दिच्या वेळी विशेष महिलांना दोन फे-या तर मध्य रेल्वे ७०६ फे-या धावत आहेत. या संदर्भात १८ऑक्टोबर रोजी राज्य सरकार सोबत चर्चा करण्यात आली. तर गृहमंञालयाने ही राज्य सरकारच्या अधिका-याची चर्चा करताना कोरोनाच्या पार्श्नभूमिवर लोकल प्रवासाची अंतिम रूपरेषा ठरवा आणि याची माहिती रेल्वे प्रशासनालाही देण्याची सूचना केली आहे . लोकल मध्ये,फलाटावर गर्दि होऊ नये, शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन व्हावे इत्यादी नियम राज्य सरकार कडून ठरविणे गरजेचे असल्याचे पश्चिम रेल्वे कडून सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारने केलेली मागणी त्याचे केलेले पालन रेल्वेकडून विविध श्रेणीतील अत्यावश्क सेवा कर्मचा-यां करीता सूरू करण्याची परवानगी देण्यात आली होती त्यानूसार रेल्वे फे-या वाढवण्याचे स्पष्ट केले. या पत्रानंतर अद्याप राज्य सरकारकडून अधिकृत भूमिका जाहिर झालेली नाही. त्यामूळे सर्वच महिलांचा लोकल प्रवास केंवा सूरू होणार असा प्रश्न महिलांकडून उपस्ठित होत आहे .