Rain update : राज्यात आज मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज
Max Woman | 6 July 2020 7:13 AM IST
X
X
मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये येथे 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्याने मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पण येत्या चोवीस तासांमध्ये या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतरही काही भागामध्ये चांगला पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे येत्या 48 तासांमध्ये आणखी काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे.
Updated : 6 July 2020 7:13 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire