Home > News > Break The Chain : पालकमंत्री अदिती तटकरे अॅक्शन मोड मध्ये...

Break The Chain : पालकमंत्री अदिती तटकरे अॅक्शन मोड मध्ये...

रायगडमध्ये करोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्याची पाहणी केली.

Break The Chain : पालकमंत्री अदिती तटकरे अॅक्शन मोड मध्ये...
X

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज 1 हजार रुग्णाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. मृत्युदर देखील चिंताजनक आहे. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोव्हिडं-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे या आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या योग्य समन्वयातून काम करताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील 15 तालुक्यातील जनतेला आरोग्य सेवासुविधा पुरविण्याबरोबरच कोरोना रुग्णांना आवश्यक ते उपचार मिळाले पाहिजेत या हेतूने त्या सतत कार्यरत आहेत. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे आदींसह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची कोव्हिडं काळातील कामगिरी व योगदान वाखाणण्याजोगे आहे.

रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष

जिल्हा स्तरावर रेमडेसिविर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. रायगड जिल्ह्यातील विविध कंपन्यात उत्पादित होत असलेला अतिरिक्त ऑक्सिजन साठा अन्य जिल्ह्यातील रुग्णालयात देण्याच्या दृष्टीने त्या प्रयत्नशील आहेत. सामान्य जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील एकूणच आरोग्य यंत्रणेच्या परिस्थिती चा आढावा घेऊन योग्य ते सहकार्य व सूचना त्या करीत आहेत. डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेऊन त्या जलदतेने सोडविण्यासाठी तटकरे पुढे सरसावल्याचे दिसतात.

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मंत्री राजेंद्र शिंगणेंना पत्र

रायगड जिल्ह्यासाठी "रेमडेसिवीर" इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन विनंती पत्र दिले आहे. जिल्ह्यात गोरगरीब कष्टकरी वर्गाची उपासमार होऊ नये यासाठी शिवभोजन थाळी संदर्भात देखील जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन आढावा घेत आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना बाबत नियोजन करण्यासाठी सातत्याने तालुका व जिल्हा प्रशासन स्तरावर बैठक घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. याबरोबरच अवकाळी पाऊस, गारपीट व वादळ वाऱ्यात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकरी, नागरिक यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य व दिलासा देण्याचे काम देखील आदिती तटकरे करताना दिसतायेत.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉक डाऊन ची घोषणा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी या बरोबरच जनतेला सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने अचूक नियोजनाची भूमिका त्यांनी घेतली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर आदिती तटकरे या मंत्रालयात जात असून विविध बाबींवर त्या विविध विभागाच्या मंत्री महोदयांची भेट घेत आहेत. कोरोना काळात रक्त साठ्याची कमतरता भासत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहेत. या उपक्रमास प्रोत्साहन देण्याचे काम तटकरे करतायेत. कोरोना रुग्णांना बेड व ऑक्सिजन साठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी व समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासन स्तरावर आदिती तटकरे अधिक दक्ष राहून कार्यरत असल्याचे दिसत आहेत.

Updated : 18 April 2021 9:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top