Home > News > 'ज्या राज्यात महिला असुरक्षित आहेत तेथील मुख्यमंत्री स्वत:ला बाबा आणि योगी म्हणतात'

'ज्या राज्यात महिला असुरक्षित आहेत तेथील मुख्यमंत्री स्वत:ला बाबा आणि योगी म्हणतात'

ज्या राज्यात महिला असुरक्षित आहेत तेथील मुख्यमंत्री स्वत:ला बाबा आणि योगी म्हणतात
X


नवी दिल्ली: बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेत्या राबड़ी देवी ( Rabri Devi ) यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून उत्तरप्रदेश ( uttar pradesh ) च्या योगी आदित्यनाथ सरकारवर हल्ला केला आहे. महिलांशी केल्या जात असलेल्या गैरवर्तन आणि अत्याचारांच्या घटना पाहता उत्तरप्रदेश ( uttar pradesh ) मध्ये दानवांच राज्य असल्याचा आरोप राबड़ी देवी यांनी केला आहे तर, याचवेळी बसपा प्रमुख मायावती ( mayawati) यांनीही उत्तरप्रदेश सरकारवर ( uttar pradesh government ) टीका केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना राबड़ी देवी म्हणाल्यात की, 'ज्या राज्यात महिला असुरक्षित आहेत तेथील मुख्यमंत्री स्वत:ला बाबा आणि योगी म्हणून संबोधतात?, उत्तरप्रदेशा ( uttar pradesh ) येथे राक्षस राज आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने तुम्ही


स्वत: ला बाबू आणि योगी म्हणतात?, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. पुढे त्यांनी, उत्तरप्रदेश पोलीस यांच्या वेशात गुंड कायदा सांभाळत असल्याचा आरोपही केला.

त्याचप्रमाणे बसपा प्रमुख मायावती ( mayawati) यांनीही याच मुद्यावरून उत्तरप्रदेश सरकार ( uttar pradesh government ) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तरप्रदेश मध्ये भाजप सरकारच्या काळात कायद्याचे नव्हे तर जंगलराज सुरु असल्याची टीका मायावती ( mayawati) यांनी केली आहे.




उत्तरप्रदेश मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ( UP PANCHAYAT 2021 ) भाजपकडून हिंसाचार करण्यात आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या हिंसाचारावरून योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहेत. एका फोटोमध्ये महिलेची भर रस्त्यात साडी ओढली जात आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या नवीन डीजीपी वर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोबतच या हिंसाचार वरुन डीजीपीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Updated : 10 July 2021 1:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top