Home > News > आणि पीव्ही सिंधू यांनी प्रथमच सिंगापूर ओपन जिंकली...

आणि पीव्ही सिंधू यांनी प्रथमच सिंगापूर ओपन जिंकली...

आणि पीव्ही सिंधू यांनी  प्रथमच सिंगापूर ओपन जिंकली...
X

भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधू यांनी सिंगापूर ओपन सुपर 500 या खेळ मालिका विजेतेपद पटकावले आहे. तिने रोमहर्षक फायनलमध्ये चीनच्या झेडवाय वांगचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला. सिंधूने प्रथमच सिंगापूर ओपन जिंकली आहे.

असा पार पडला फायनलचा थरार

सिंधूने पहिला गेम जिंकला त्यावेळी स्कोर होता 21-9 पीव्ही सिंधूने सुरुवातीच्या गेममध्ये पूर्णपणे वर्चस्व राखले. ततिने हा गेम २१-९ अशा मोठ्या फरकाने जिंकला. या गेममध्ये फक्त एकदा स्कोअर (2-2) बरोबरीत आला. त्यानंतर सिंधूने आघाडी घेतली.

दुसऱ्या गेममध्ये चीनचे पुनरागमन : 21-11 चीनच्या स्टारने पहिल्या गेममधील पराभवानंतर जोरदार पुनरागमन केले. तिने या सामन्यात सिंधूला जवळही येऊ दिले नाही. संपूर्ण स्पर्धेत ती एकतर्फी आघाडीवर दिसली. दुसऱ्या गेम मध्ये सिंधूने सुद्धा काही गुण मिळवले पण जिंकण्यासाठी ते पुरेसे नव्हते. वांगच्या या विजयासह अंतिम सामना १-१ असा बरोबरीत सुटला.

निर्णायक फेरीत सिंधूचा जोर : २१-१५ आता सामना बरोबरीत होता. जो तिसरा गेम जिंकेल तो विजेतेपद मिळवेल. अशा स्थितीत सिंधूने पहिला रेलिंग जिंकून आघाडी घेतली, त्यानंतर चीनच्या खेळाडूने गुण मिळवला. खेळाच्या सुरुवातीला वांगने जोर दिला. पण, सिंधूने तिच्या अनुभवाचा फायदा घेत विजय मिळवला. या गेममध्ये 4 वेळा स्कोअर बरोबरीत होता त्यावरून या खेळातील थराराचा अंदाज लावता येतो. पण, शेवटी सिंधूने आघाडी घेत त्याचे विजयात रुपांतर केले. दरम्यान, वांगने पुनरागमन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण, सिंधूने तिला कसलीच संधी दिली नाही.

सिंगापूर ओपन जिंकणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे

सिंगापूर ओपन जिंकणारी पीव्ही सिंधू तिसरी खेळाडू ठरली आहे. ही ट्रॉफी मिळवणारी दुसरी भारतीय महिला शटलर बनली आहे. त्याच्या आधी सायना नेहवालने 2010 मध्ये आणि साई प्रणीतने 2017 मध्ये हे विजेतेपद पटकावले आहे.

Updated : 17 July 2022 6:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top