Home > News > संतापजनक : नाळ ठेचून आईने 'तिला' फेकलं कचराकुंडीत

संतापजनक : नाळ ठेचून आईने 'तिला' फेकलं कचराकुंडीत

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील घटना..

संतापजनक : नाळ ठेचून आईने तिला फेकलं कचराकुंडीत
X

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्त्री जातीचे जीवंत अर्भक आढळले. काळेवाडीतील राजवाडेनगर, तापकीर मळा चौक येथे सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अर्भकाच्या माता-पित्यांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

सकाळी साडेसहाच्या सुमारास रस्ते सफाई करत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी नितीन सुर्यवंशी नामक व्यक्तीने या अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांनी कचराकुंडीत बघितलं असता हे अर्भक आढळलं. अर्भकावर एकही कपडा नव्हता व मुलीची नाळ ठेचून तोडण्यात आल्याचे त्यांना आढळले.

दरम्यान, पुणे पोलीस मुलीच्या आई-वडीलांचा शोध घेत असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Updated : 28 Oct 2020 7:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top