"मा. आदित्य दादा यांना पत्रास कारण की.."
रायगडावर रोपवे बांधू नये म्हणून पुण्यातील 8 वर्षाच्या साईषानं मंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिलेलं पत्र होतय व्हायरल
X
सध्या राज्यभर रायगडावर रोपवे बांधावा/बांधू नये अशा चर्चा सुरु आहे. यावर अनेक दुर्गप्रेमी आपआपली मत व्यक्त करत आहेत. याच संदर्भात पुण्यातील साईषा धुमाळ नावाच्या ट्रेकर व दुर्गप्रेमी चिमुरडीने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिलं पत्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
राज्यातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाकडून पुण्यातील एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर पर्यटकांना लवकरच रोपवे ची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील बैठक सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली व सबंधीत करारावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व राज्य मंत्री आदिती तटकरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
मात्र हा रोपवे बांधू नये अशी मागणी साईषा धुमाळ या चिमुकलीनं पत्राद्वारे केली आहे. साईषानं आपल्या पत्रात लिहिलं की, "माननीय आदित्य दादा यांना पत्रास कारण की, राजगडावर रोपवे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरं असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका प्लीज. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरांच्या मागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो. मी एक छोटी गडप्रेमी आणि ट्रेकर साईषा अभिजीत धुमाळ."