Up Election 2022: "प्रियांका गांधी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचा चेहरा बनू शकतात"
X
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. विशेष करून भाजप आणि कॉंग्रेससाठी हि निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून रोज नवनवीन पत्ते टाकले जात आहे. त्यातच आता कॉंग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीदने प्रियंका गांधींबाबत मोठे विधान केले आहे. कार्यकर्ता सम्मेलनात सलमान खुर्शीद यांनी म्हटले की, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकांमध्ये प्रियंका गांधी कॉंग्रेसचा चेहरा असणार असून, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली 2022 ची युपी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं सुद्धा खुर्शीद म्हणाले.
उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी भाजप,कॉंग्रेस, बसपा आणि सपा ह्या चार पक्षांनी कंबर कसली आहे. तर कॉंग्रेस प्रियंका गांधीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मुख्यमंत्रीचा चेहरा सुद्धा प्रियंका गांधीचा म्हणून पुढे घोषित करू असेही सलमान खुर्शीद म्हणाले आहे. त्यामुळे भविष्यात निवडणुकीत इतर पक्षाची आघाडी असो की पक्षात नाराजी असलेल्यांची समजुत काढणे असो यासाठी प्रियंका गांधींची भूमिका महत्वाचे ठरणार आहे.