Power crisis: देशावर वीज संकट; फक्त 3 दिवसांचा कोळसा शिल्लक
X
चीनप्रमाणे देशात वीज संकट ( Power crisis ) निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि इतर संस्थांनी जारी केलेल्या कोळशाच्या उपलब्धतेच्या ( Coal production ) आकडेवारीचे मूल्यांकन केल्यानंतर तज्ञांनी हा इशारा दिला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील 135 औष्णिक ऊर्जा प्रकल्पांपैकी 72 प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठी फक्त तीन दिवसांचा कोळसा शिल्लक आहे.
संयंत्र एकूण वीज वापराच्या 66.35 टक्के उत्पन्न करतात. अशी परिस्थितीत 72 कारखाने बंद असल्याने एकूण वापरात 33 टक्के घट होऊ शकते. सरकारच्या मते, कोरोनाच्या आधी, ऑगस्ट-सप्टेंबर 2019 मध्ये, देशात 10,660 कोटी युनिट विजेचा दररोज वापर होता, जो ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये वाढून 12,420 कोटी युनिट झाला आहे. या काळात, एकूण वापराच्या 61.91 टक्के वीज औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये निर्माण होत होती. यामुळे, या संयंत्रांमधील कोळशाचा वापर देखील दोन वर्षांत 18 टक्क्यांनी वाढला आहे.
यात चिंतेचा विषय म्हणजे, उर्वरित 50 संयंत्रांपैकी चार कारखान्यांकडे फक्त 10 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. तर इतर 13 कारखान्यांकडे 10 दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक आहे. त्यात इंडोनेशियामधून आयात केलेल्या कोळशाची किंमत दोन वर्षात प्रति टन 60 डॉलरवरून तीन पतीने वाढत 200 डॉलरपर्यंत पोहचली आहे.