Home > News > ‘हा आमचा देश, इथं गणपती मूर्ती विकायची परवानगी नाही’ म्हणणारी ती महिला नक्की कोण?

‘हा आमचा देश, इथं गणपती मूर्ती विकायची परवानगी नाही’ म्हणणारी ती महिला नक्की कोण?

‘हा आमचा देश, इथं गणपती मूर्ती विकायची परवानगी नाही’ म्हणणारी ती महिला नक्की कोण?
X

सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बुरखा घातलेली माहिला एका सुपरमार्केटमध्ये गणपतीच्या मूर्ती मांडणीवरुन (शेल्फवरुन) खाली ढकलताना दिसत आहे. अनेक पेजेसवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे संतापाची लाट उसळली आहे.

हा व्हिडीओ बाहरीन या देशाची राजधानी मनामा येथील जाफेयर सुपरमार्केटचा असल्याचं वृत्त आहे. या मार्केटमध्ये एक बुरखाधारी मुस्लीम महिला विक्रीसाठी ठेवलेल्या गणेश मूर्तींची विटंबना करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. महिला ही विटंबना करत असताना कुणीही तिला थांबवत नाही, असंही या व्हिडीओत दिसत आहे. ही महिला सुपरमार्केटच्या कर्मचाऱ्याशी उद्धटपणे बोलताना दिसत आहे. हा सर्व प्रसंग तेथील अन्य एका महिला ग्राहकाने मोबाइलवर शूट केला.

मुस्लीम देशामध्ये गणपतीच्या मूर्ती का विकल्या जात आहे असा आक्षेप नोंदवत या महिलेने मूर्ती मांडणीवरुन खाली ढकलल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. “हा मोहम्मद बीन इसाचा देश आहे. ते हे मान्य करतील असं तुम्हाला वाटतं का?, हा मुस्लीम देश आहे. बरोबर ना?,” असं ही महिला दुकानदाराशी हुज्जत घातलाना ओरडत आहे. “आता या मूर्तीची पूजा कोण करत बघू, करा पोलिसांना फोन,” असं म्हणत ही महिला दोन ते तीन मूर्ती खाली ढकलून त्यांचे नुकसान करते.

काहीजण हा मध्य आशियामधील देशांमधील असल्याचे सांगत आहेत तर काहींनी थेट केरळवगैरेमधील असल्याचा दावा केला आहे. मात्र हा व्हिडिओ बहरीनमधील असून या प्रकरणी पोलिसांनी करावाई केली आहे.

https://twitter.com/dillikasunny/status/1294957733364396032

Updated : 17 Aug 2020 5:59 PM IST
Next Story
Share it
Top