दोन कोटी महिलांना लखपती बनवणार- पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi Comment on Women Empowerment business Drone use in Agriculture
X
पंतप्रधान मोदी यांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील दोन कोटी महिलांना लखपती बनवणार असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी मणिपूरवर भाष्य केले. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचं कुणीच समर्थन करू शकत नाही. मात्र आता मणिपूरमध्ये शांतता निर्माण होत आहे. त्याबरोबरच जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक भारतात असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. त्याबरोबरच पंतप्रधान मोदी म्हणाले महिला सक्षमीकरणासाठी योजना आणण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन कोटी महिलांना सरकार लखपती बनवणार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं. त्याबरोबरच महिला शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
महिला चालवणार ड्रोन
पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला शक्तीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांना कौशल्य विकासाचे शिक्षण देण्यात येईल. त्यानंतर सेल्फ हेल्प गृपच्या माध्यमातून महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले