Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलवरील महागाई काही थांबायला तयार नाही, आज पुन्हा....
X
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत होत असून, त्याचा सर्वात मोठा परिणाम भारतात दिसून येत आहे. देशभरात महाग पेट्रोलमुळे लोक अस्वस्थ आहेत, बहुतेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये तेलाच्या किमतींवर महागाईचा परिणाम थांबण्याचे नाव घेत नाही.
भारतीय पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी आज (गुरुवार) म्हणजेच 07 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी आजही डिझेल आणि पेट्रोल या दोन्हीच्या इंधनाचे दर वाढवले आहेत. पेट्रोल 30 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटरने महाग झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज 30-35 पैशांनी वाढ झाल्याने दर विक्रमी पातळीवर आहे.
सरकारी तेल कंपन्यांच्या ताज्या अपडेटनुसार, राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 103.24 रुपये आणि मुंबईत 109.25 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. जर तुम्ही देशातील चार महानगरांची तुलना केली तर पेट्रोल आणि डिझेल मुंबईत सर्वात महाग आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राज्यातील स्थानिक करांवर अवलंबून असतात. ऑक्टोबरमध्ये संपूर्ण आठवड्यात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. 24 सप्टेंबरपासून आतापर्यंत डिझेलच्या किंमतीत प्रति लीटर 3 रुपये 15 पैशयानी वाढ झाली आहे. तर 28 सप्टेंबरपासून पेट्रोल 2 रुपये 10 पैशांनी महाग झाले आहे. या महिन्यात आतापर्यंत फक्त एक दिवस (04 ऑक्टोबर) पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत.