पद्मश्री राहीबाईं पोपरे यांच्या गावातील मराठी शाळेचा झाला कायापालट..
X
पद्मश्रींना सलाम या उपक्राअंतर्गत अग्नीपंख फौंडेशनचा श्रीगोंदा यांनी राबवला उपक्रम.पद्मश्री बिजमाता राहीबाई पोपेरे यांना सलाम करण्यासाठी श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने भरीव योगदान देत तसेच येथील अनेक समस्यांवर मात करुन शाळा सुंदर आणि डिजिटल केली आहे. अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील पोपेरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विविध उपक्रमांनी समृध्द केली आहे. सौर ऊर्जेवर डिजीटल शाळा , सुंदर आणि बोलक्या भिंती , एलसीडी टीव्ही , शालेय एज्युकेशन सॉफ्ट वेअर्स , वृक्ष लागवड, खेळाचे साहित्य असे विविध उपक्रम या शाळेत राबवण्यात आले आहेत.बदललेली शाळा बघून लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आहे. या शाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकरराव रहाणे , पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. युपीएससी परिक्षेतून यशाचे शिखर करणारा प्रशांत डगळे याच्या आई वडीलांचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आला .यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री राहीबाई पोपेरे होत्या .
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले की अग्नीपंख फौंडेशनने दुर्गम भागातील अहमदनगर जिल्हा परिषदेची पोपेरेवाडी शाळा डिजीटल करुन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना सलाम केला या उपक्रम इतर सामाजिक जाणीवेतून काम संस्थांसाठी प्रेरणादायी आहे अग्नीपंखचा आदर्श घेऊन काम केले इतर प्राथमिक शाळांचा चेहरामोहरा बदलनार आहे.