#Pune येथे A. R. Rahman यांना पोलिसांनी रोखले..
X
ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए आर रहमान यांना पुण्यातील लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गाण्यापासून रोखण्यात आले. रविवारी रहमान पुण्यातील राजा बहादूर मिल परिसरात स्टेज शो करत होता. त्यानंतर पोलिस आले आणि मंचावर गेले आणि त्यांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. नक्की काय घडलं कार्यक्रमादरम्यान पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा..
पोलिसांनी सांगितले की रात्रीचे 10 वाजले होते आणि त्यानंतरही रहमानने आपला लाईव्ह कार्यक्रम थांबवला नव्हता. रात्री 10 नंतर कार्यक्रमाला आयोजकांकडून परवानगी घेण्यात आली नाही. हे पाहता गायकाचा लाईव्ह कॉन्सर्ट मध्येच थांबवण्यात आला.
रहमानला कदाचित वेळ माहित नसावी..
या म्युझिक कॉन्सर्टमध्ये एआर रहमान आपले शेवटचे गाणे गात होते. कदाचित त्यांना वेळ माहित नसेल. तेथे उपस्थित असलेल्या आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना संदेश दिला की, 10 वाजून गेले आहेत, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परवानगीशिवाय 10 वाजल्यानंतर कोणताही लाईव्ह कार्यक्रम करता येणार नाही. रहमानने पोलिसांची आज्ञा पाळली आणि बॅकस्टेजवर जाऊन शो संपवला.