जेव्हा मुस्लिम महिला मंदिर उघडण्याची मागणी करतात...
X
तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुस्लीम महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. त्यांचे म्हणणे होते की, सरकारने मंदिरे लवकरात लवकर खुली करून द्यावी. कारण मंदिरे बंद असल्यामुळे त्यांना त्यांचे पोट भागवणे कठीण चालले आहे. मंदिरे जर लवकरात लवकर खुली करण्यात आली नाहीत तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या महिलांनी दिला आहे.
मंदिर बंद असल्याने मंदिरावराती अवलंबून असलेले स्थानिक लोकांचे लहान मोठे उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचे व्यवसाय येथे चालतात त्याच बरोबर शारदीय नवरात्रोत्सव मध्ये शहराची आर्थिक उलाढाल चालते मात्र मंदिरे बंद असल्याने यांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे सरकारने तुळजाभवानी मंदिर भाविसकांसाठी सुरु करावीत अशी मागणी या महिलांनी केली आहे.