भाजी मार्केटमध्ये खुलेआम मटका, जुगार ; एक व्यक्तीने व्हिडिओ केला ट्विट आणि..
शहरातील विविध भागात जुगार, मटका त्याचबरोबर अवैध दारू विक्री असे अनेक अवैद्य व्यवसायांनी चांगलेच डोके वर काढले आहे. पोलीस प्रशासन याकडे जाणून-बुजून कानाडोळा करत आहे का?
X
शहरातील विविध भागात जुगार, मटका त्याचबरोबर अवैध दारू विक्री असे अनेक अवैद्य व्यवसायांनी चांगलेच डोके वर काढले आहे. या सगळ्या परिस्थितीला आता सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशाप्रकारे चौकाचौकात सुरू असलेले मटका अड्डे व दारू विक्रीमुळे सामान्य नागरिक जेरीस आले आहेत. उघडउघड मटका दारू विक्री होत असेल तर पोलीस प्रशासन याकडे जाणून-बुजून कानाडोळा करत आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे.
आता हेच बघा ना.. दीपक ठाकूर या ट्विटर वापरकर्त्याने ठाणे पश्चिम या ठिकाणी कशाप्रकारे खुलेआम मटका जुगार खेळला जात आहे याचा एक विडिओ चित्रित करून समाज माध्यमांवर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत "भाजी मार्केट मध्ये वर्तक नगर चौक, शौचालयाच्या जवळ ठाणे पश्चिम येथे खुलेआम चालू आहे मटका जुगार चा सर्वात मोठा धंदा" असं म्हणत हा व्हिडीओ @ThaneCityPolive व @DGPMMaharashtra यांना टॅग केला आहे. आता त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे तो जर पाहिला तर या व्हिडिओ मध्ये भाजीमार्केटच्या ठिकाणी खुलेआम मटका खेळत असल्याची दृश्ये या व्हिडीओमधून समोर येत आहेत. या ठिकाणी एक दोन नाही तर मोठ्या संख्येने लोक एकत्र जमून जुगार खेळत असल्याचा हा व्हिडिओ आहे.
भाजी मार्केट मध्ये, वर्तक नगर चौक, शौचालयच्या जवळ, ठाणे पश्चिम येथे खुलेआम चालू आहे मटका जुगाराचा सर्वात मोठा धंदा @ThaneCityPolice @DGPMaharashtra pic.twitter.com/lbhs8oogFt
— Deepak Thakur (@DeepakT78129044) March 30, 2022
सर्वसामान्य लोकांना वारंवार अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावं लागतं आहे. खुलेआम चौकात मटका, जुगाराचे अड्डे भरत आहेत. मग अशाप्रकारे या सर्व गोष्टींना त्रस्त झालेली जनता आता समाज माध्यमांचा वापर करत या सर्व गोष्टी प्रशासनाच्या डोळ्यासमोर आणून देत आहेत. आता दिपक ठाकूर यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे त्या व्हिडिओला ठाणे सिटी पोलीसांनी लगेच रिप्लाय करत "आपली तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तक नगर पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळवली आहे" असं म्हंटल आहे.
आपली तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळवली आहे.
— Thane City Police (@ThaneCityPolice) March 30, 2022
त्यामुळे आता आसपासच्या परिसरात घडणाऱ्या अशा अवैध गोष्टींवर फक्त पोलिसांचीच नाही तर सजन, जागरूक नागरिकांची ही नजर आहे.