पोलिस कर्मचाऱ्याचे बाथरूम मध्ये आंघोळ करतांनाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
X
बुलडाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचे बाथरूम मध्ये आंघोळ करतांनाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी पिडीत महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात फोटो व्हायरल करणाऱ्या मोबाईल नंबर धारकावर विनयभंगसह आय टी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पिडीत महिला कर्मचारीचे अत्यंत खाजगी फोटो तिच्या ईमेल वर सेव्ह होते. अज्ञात व्यक्तीने हा ईमेल आयडी हॅक करुन जवळपास 30 नग्न फोटो पिडीत महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मैत्रीणीच्या मोबाईल नंबर वर अश्लील संदेश लिहून 17 जुलै रोजी पाठवला. ही बाब पिडीत महिलेच्या लक्षात येताच तिने 18 जुलै रोजी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
महिला पोलीस कर्मचारीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारक आरोपीवर विनयभंगची कलम 354, 354 (ड), आयटीअॅक्टचे 66 (सी), 66 (ई), 67 (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सायबरसेलकडे वर्ग करण्यात येणार आहे. तपासाअंती पिडीत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नग्न फोटो कुणी व्हायरल केले हे स्पष्ट होणार आहे. यासंदर्भात मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.