महापोर्टलवरून निलेश राणें यांची सुप्रिया सुळेंवर टीका
X
मुंबई: महापोर्टल बंद करून नालायक ठाकरे सरकार विसरलं की विद्यार्थी जवळपास दीड वर्ष नवीन प्रणालीची वाट बघतायत, अशी जहरी टीका करत भाजप नेते निलेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, मंत्री बच्चू कडू, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सुद्धा टीका केली आहे.
निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हंटल आहे की, 'ठाकरे सरकारने महापोर्टल बंद केले मात्र, सुरु कधी करणार हे सांगितले नाही. तेव्हा सुप्रिया सुळे, रोहित पवार,बच्चू कडू,जितेंद्र आव्हाड हे त्यावेळी महापोर्टल बंद करण्यासाठी होते. तसेच नवीन प्रणालीत सुरु करण्याचे सुद्धा ते म्हणाले होते. मात्र आता त्यांना याचा विसर पडला असल्याचा टोला राणे यांनी लगावला.
26 ते 28 हजार पदासाठी 32 लाख विध्यार्थांनी अर्ज केले. त्याच काय केलं हे ठाकरे सरकारने अजून सांगितलं नाही.त्यामुळे विध्यार्थांची वाट लावण्याचंच ह्या सरकारने ठरवले असल्याचं दिसत आहे. पण जेवढ आग्रही महापोर्टल बंद करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि इतर नेते होते, तेवढच आता सुरु करण्यासाठी रहा,अशी विनंती सुद्धा राणे यांनी केली.