Insurance तेही चक्क व्हॉट्सअॅपवर! इतकंच नाही तर आणखी भन्नाट फीचर्स घेऊन येतंय व्हॉट्सअॅप
X
व्हॉट्सअॅप वापरत नाही अशी व्यक्ती क्वचितच आढळेल. इतक्या मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅपचे युझर्स एसल्याने व्हॉट्सअॅ्प देखील सतत नवनवीन फीचर्स वापरकर्त्यांसाठी आणत असतं. व्हॉट्सअॅपने आता युजर्सना आणखी एक खूशखबर दिली आहे. 2022 मध्ये व्हॉट्सअॅप काही धमाकेदार फीचर्स आणणार आहे. तर काही फीचर्सचे अपडेट आहे. यामध्ये आता Insurance चाही समावेश असणार आहे. Insurance सह अनेक कामं करता येणार आहेत.
2022 मध्ये व्हॉट्सअॅप Insurance चा समावेश करणार आहे. ज्याद्वारे Insuranceसह अनेक प्रकारची कामं व्हॉट्सअॅपवरून सहज करता येतील. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरण्याची शैली आता पुर्णपणे बदलणार आहे. हे असणार आहेत व्हॉट्सअॅपचे काही नवे अपडेट्स...
WhatsApp Logout
व्हॉट्सअॅप युजर्सना लवकरच जर एकापेक्षा अधिक डिव्हाइसमध्ये एकच एकाऊंट वापरायचे असेल तर डिलीट अकाऊंट बटणाऐवजी WhatsApp Logout आणि मल्टी-डिव्हाइस फीचर सपोर्ट दिला जाणार आहे. व्हॉट्सअॅप लॉगआऊट फीचर युजर्सना दुसऱ्या डिव्हाइसवरून व्हॉट्सअॅप खाते लॉगआऊट करण्याचा पर्याय देईल. हे फीचर फेसबुकच्या लॉगआऊट फीचरप्रमाणे काम करणार आहे. यामुळे आता युझर्सना व्हॉट्सअॅपचं एकच अकाऊंट अनेक डिव्हाइसेसमध्ये वापरता येणार आहे.
Instagram Reel on WhatsApp
Instagram रिल्स सेक्शन लवकरच व्हॉट्सअॅपवर देण्यात येणार आहे. ज्याद्वारे युजर्स थेट व्हॉट्सअॅपवरूनच Instagram रील्स पाहू शकणार आहेत.
Read Later option
व्हॉट्सअॅपचं सध्या रिड लेटर या महत्वाच्या फीचरवर काम सुरू आहे. हे फीचर Archived Chats ची जागा घेईल. हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही व्हर्जनसाठी येईल.
Last Seen Status
हे फीचर तुमची आपली व्हॉट्सअॅप प्रायव्हसी वाढवण्याचं काम करेल. या फीचरच्या मदतीने, युजर्स last seen status बाबत हृवा तो निर्णय घेऊ शकतात.
WhatsApp Insurance
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लवकरच Insurance खरेदी करता येणार आहे. आरोग्य विमा आणि मायक्रो-पेन्शन Products भारतात व्हॉट्सअॅपद्वारे रोल आउट करण्यात येत आहे. यासाठी परवानाधारक आर्थिक सेवा करणाऱ्या प्लेयर्सची मदत घेतली जाणार आहे.
कॉन्टॅक्ट कार्डसाठी नवीन डिझाइन
व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट कार्डसाठी नवीन डिझाइन आणण्याची शक्यता आहे. आपण त्यावर टॅप केल्यावर आपले नाव त्यात दिसेल. तसेच व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट नवीन डिझाइनमध्ये सादर केला जाऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Desktop Photo Editor
व्हॉट्सअॅप ने या फीचरच्या रुपाने डेस्कटॉप फोटो एडिटरला आणले आहे. जे एक आवश्यक फीचर आहे. हे फीचर युजर्सना डेस्कटॉप अॅपच्या मदतीने फोटो सेंड करण्याआधी एडिट करण्याचा ऑप्शन देतो. याआधी हे काम पेंट किंवा अन्य एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने करावे लागत होते. व्हॉट्सअॅप फीचर्सच्या मदतीने युजर्स स्टिकरला सुद्धा अॅंड करू शकता.
Sticker Suggestions
व्हॉट्सअॅप चॅट करताना स्टिकरचा उपयोग करण्यासाठी आपल्याला योग्य स्टिकर शोधण्यासाठी अनेक टॅब मधून जावे लागते. कधी कधी आपल्याला हवे असलेले स्टिकर्स मिळतही नाहीत. आता हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअॅप युजर्सना चॅटिंग दरम्यान स्टिकरचं सजेशन दिसेल. यावरून आपल्याला एकदम योग्य स्टिकर वापरण्यास मदत होणार आहे.