Home > News > वेळीच आवाज उठवला असता तर कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता : रुपाली चाकणकर

वेळीच आवाज उठवला असता तर कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता : रुपाली चाकणकर

राज्यात सध्या फोन टॅपिंगवरुन आरोप प्रत्यारोप सुरु असताना राष्ट्रवादीने महीला वनअधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येवरुन अपक्ष खासदार नवनीत राणा यांना लक्ष करत वेळीच आवाज उठवला असता तर कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता असा टोला रुपाली चाकणकर यांनी लावला आहे.

वेळीच आवाज उठवला असता तर कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता : रुपाली चाकणकर
X

दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती, अशा सुसाईट नोटमधील पानाचा फोटो सोशल मिडीयावर टाकत चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांनी दिपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले नसते तर दीपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता, असे म्हटले आहे.

तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे चाकणकर यांनी म्हटले. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना कोंडीत पकडले आहे. तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का, असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.

साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की त्यांनी कोणत्याही गोष्टीची खात्री न करता माझ्या नावाची नोटीस काढणे सुरु केले. काही खटकले तरी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले. माझ्याकडे 3 गावांचे पुनर्वसन आहे. मात्र साहेबांनी मला त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. पुनर्वसन करताना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी कधीच माझी बाजू समजून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले. ते फक्त आणि फक्त मला कमीपण दाखवण्याचे कारण शोधत राहतात. मार्च 2020 मध्ये त्यांनी मांगीया येथील अतिक्रमणबाबत मला फोन केला. तू आताच्या आता आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटवं, अशा सूचना दिल्या.

यानंतर मी स्टाफला घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथील लोक शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांनी फोनवर कळवल्यानंतरही ते आम्हाला तुम झूट बोल रहे हो, नाटक कर रहे हो असे म्हणाले. जेव्हा गावकरी माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करणार होते, ते मी त्यांना कळवले त्यावेळी मी स्वत: एसपी ला बोलून तुमच्यावर ऍट्रॉसिटी लावतो. चार महिने RFO जेलमध्ये राहिल्यानंतर कसे वाटते हे दाखवतो. याची रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे असं त्या सुसाईड नोट मधे म्हटलं होतं.

विशेष म्हणजे अमरावतीच्या अपक्ष खासदार यांनाही या आधी खासदार नवनीत राणा यांनाही ती रेकॉर्डिंग ऐकवली आहे. अ‍ॅट्रॉसिटीत बेल न झाल्याने मी सुट्टीवर गेले. त्यानंतर कोर्टाच्या निकालाबद्दल मी कळवले होते. पण शीवकुमार यांनी मला रुजू करुन घेण्यास नकार दिला. तसेच माझ्या रजा कालावधीतील सुट्टी नाकारण्याची शिफारस केली. त्यावेळी आपण देखील माझी सुट्टी नाकारली. मला पगार दिला नाही, असे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येनंतर लिहलेल्या चिठ्ठीत म्हटले होते.

Updated : 26 March 2021 5:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top