नवरात्री विशेष बंजारा महिलांच्या कलाकुसरीचे प्रदर्शन...
X
सोमवार पासून दसरा सणाची सुरुवात होत आहे .या सणात नवरात्रीत दांडिया खेळला जातो. त्यासाठी लागणारे ड्रेस बाजारात उपलब्ध आहेत .पण खास बंजारा समाजातील महिलांनी सुंदर नक्षीकाम करून तयार केलेले ड्रेस ,हस्तकला, शोभेच्या वस्तू,दागिने यांचे प्रदर्शन पुण्यात होणार आहे.
मराठवाडा विभागातील उमेद MSRLM जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सर्व जिल्हे व SGS मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन पार पडत आहे.नवरात्र विशेष बंजारा महिलांनी त्यांच्या कलाकुसरीचे तयार केलेले ड्रेस, दागिने, हस्तकला शोभेच्या वस्तु यांचे प्रदर्शन व विक्री चे आयोजन केले गेले आहे.
शुक्रवारपासून सुरू झालेले प्रदर्शन रविवारपर्यंत असणार आहे .हे प्रदर्शन SGS मॉल, कॅम्प, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. आपण कुटुंबासह येवुन भेट देऊन त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे हि विनंती उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडून करण्यात आले आहे.
औरंगाबाद- मराठवाडा विभाग,
औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यातील महिला सहभागी होणार आहेत.