नवनीत राणांना आदिवासी महिलांनी घेरलं; साड्या वाटपाचा फसला खेळ
नवनित राणा यांच्याकडून मेळघाटमधील आदिवासी महिलांना होळीच्या सणानिमित्त साड्या वाटप करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आदिवासी महिलांकडून पारदर्शक साड्या दिल्यामुळे नवनित राणा यांचा जोरदार विरोध केला होता.
X
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार निवडून यावा यासाठी जोरदार प्रचार सुरू आहेत, अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघातील खासदार नवनीत राणा आपल्या मतदारसंघातील मेळघाटमधील आदिवासी वस्त्यांमध्ये लोकांच्या भेटीला गेल्या असता त्यांचा त्यांच्याच मतदारसंघातून आदिवासी वस्तीतल्या महिलांकडून कडाडून विरोध करण्यात आला. त्याचं कारण असं की, मागील काही दिवसांपूर्वी नवनित राणा यांच्याकडून मेळघाटमधील आदिवासी महिलांना होळी सणानिमित्त साड्या वाटप करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आदिवासी महिलांकडून पारदर्शक साड्या दिल्यामुळे नवनित राणा यांचा जोरदार विरोध केला होता.
होळीच्या दिवशी साड्या जाळल्या
खासदार नवनीत यांच्याकडून देण्यात आलेल्या पारदर्शक साड्यांचा आदिवासी महिलांकडून विरोध करण्यात आला. आणि साड्या द्यायच्याच होत्या तर जरा नेसण्यालायक तरी द्यायच्या होत्या, या अशा पध्दतीच्या साड्या देऊन आमच्या गरीबीची थट्टा केली आहे, आम्हाला ज्या साड्या दिल्या त्या तुम्ही नेसू शकाल का? अशा तिव्र शब्दांत असंतोष व्यक्त करत आदिवासी महिलांनी नवनीत राणांचा कडाडून विरोध केला होता. त्याचबरोबर नवनीत राणा, निवडून येऊन ज्या खुर्चीवर बसली आहे, ते आमच्या मतांमुळेच, आता परत मेळघाटमध्ये मत मागायला येऊ नका, असा इशारा देखील आदिवासी महिलांकडून देण्यात आला होता.
नवनीत राणांना आदिवासी महिलांनी घेरलं
खासदार नवनीत राणा या आपल्या मतदारसंघातील मेळघाटमधील आदिवासी वस्तीमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेल्या असता आदिवासी महिलांनी त्यांना चहूबाजूंनी घेरलं आणि जाब विचारला की, तुम्ही आम्हाला अशा साड्या का दिल्या? आम्ही या साड्या कशा नेसायच्या? असा जाब विचारत आदिवासी महिलांनी नवनीत राणांनी चांगलंच धारेवर धरलं.