Home > News > नासाकडून चंद्रावर जाणाऱ्या क्रूची घोषणा, महिला अंतराळवीराची निवड...

नासाकडून चंद्रावर जाणाऱ्या क्रूची घोषणा, महिला अंतराळवीराची निवड...

नासाकडून चंद्रावर जाणाऱ्या क्रूची घोषणा, महिला अंतराळवीराची निवड...
X

नासा 50 वर्षांनंतर चंद्रावर अंतराळवीर पाठवणार आहे. आर्टेमिस-2 मोहिमेअंतर्गत पुढील वर्षी चार अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परत येतील. या क्रूमध्ये प्रथमच एक महिला आणि आफ्रिकन-अमेरिकन अंतराळवीर यांचा समावेश असेल. अपोलो मोहिमेच्या 50 वर्षांनंतर, माणूस चंद्रावर जाणार आहे. नक्की हि मोहीम काय आहे? चंद्रावर जाण्यासाठी या मोहिमेत सहभागी असलेली महिला कोण आहे? हे सर्व आपण पुढच्या ३ मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत.., त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा..

अगदी ५० वर्षानंतर नासा व्यक्तीला चंद्रावर पाठवणार आहे. या 10 दिवसांच्या चंद्र मोहिमेसाठी क्रिस्टीना हॅमॉक कोच यांची तज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे. याआधी क्रिस्टीनाने सर्वात जास्त काळ अंतराळात राहण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्याशिवाय अमेरिकन नौदलातील व्हिक्टर ग्लोव्हर यांचीही पायलट म्हणून निवड झाली आहे. चंद्र मोहिमेवर अंतराळात जाणारा तो पहिला कृष्णवर्णीय अंतराळवीर असेल. या क्रूमध्ये प्रथमच एक महिला आणि आफ्रिकन-अमेरिकन अंतराळवीर यांचा समावेश असणार आहे..

2025 मध्ये अंतराळवीर चंद्रावर उतरतील.

या मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांपैकी तीन अमेरिकेचे आहेत तर एक कॅनडाचा आहे. ह्युस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटरमधून या नावांची घोषणा करण्यात आली. चंद्र मोहिमेदरम्यान अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीत. हे एक फ्लायबाय मिशन आहे ज्या अंतर्गत अंतराळवीर चंद्रावर प्रदक्षिणा केल्यानंतरच परत येतील. ही मोहीम यशस्वी झाल्यास, 2025 मध्ये आर्टेमिस-3 मिशन पाठवले जाईल, ज्यामध्ये अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील.

Updated : 6 April 2023 5:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top