'सुल्ली डील्स'; मुस्लीम महिला ऑनलाइन विक्रीला, ट्रोलिंगचा नवा प्रकार
X
नवी दिल्ली: सोशल मिडियावर महिलांना 'ट्रोल' करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पण आता एका विशिष्ट समाजातील महिलांना 'ट्रोल' (troll )करून, त्यांची बदनामी करण्याच्या घटना समोर येत आहे. ट्विटर आणि काही सोशल साईडवर सद्या 'सुल्ली डील्स' ( Sulli Deals ) हा शब्द चर्चेचा विषय बनला असून, या माध्यमातून मुस्लीम महिलांना टार्गेट करून, त्यांची बदनामी केली जात आहे.
शेकडो मुस्लिम महिलांचे छायाचित्र 'सुल्ली डील्स' नावाने 4 जुलै रोजी एका अॅपवर अपलोड करण्यात आले. ही छायाचित्रे अपलोड कोणी केले हे अद्याप उघडकीस आली नाही, पण सुल्ला किंवा सुल्ली हा मुस्लीम समाजातील एक अपमानजनक शब्द आहे, जो मुस्लिमांसाठी वापरला जातो.
हे अॅप तेव्हा समोर आले, जेव्हा लोकांनी ट्विटरवर 'डील ऑफ द डे' (deal of the day)(आजच्या दिवसाची विक्री) शेअर करताना वरील महिलांना टॅग करत, त्यांची माहिती शेअर केली. या अॅपमध्ये वापरल्या जाणार्या मुस्लिम महिलांची माहिती ट्विटरवरून घेण्यात आली आहे. यात 80 हून अधिक महिलांची छायाचित्रे, त्यांची नावे आणि ट्विटर हँडलची माहिती देण्यात आली आहे. तसेच या अॅपच्या वरच्या बाजूला 'फाइंड योर सुल्ली डील' असे लिहिलेलं होते.
यावर क्लिक केल्यावर, वापरकर्त्यासह मुस्लिम महिलेचे चित्र, नाव आणि ट्विटर हँडल शेअर केले जात होते. विशेष म्हणजे यात माहिती देण्यात आलेल्या मुस्लीम महिला ह्या डॉक्टर,समाजसेविका, पत्रकार आणि सोशल मिडियावर सक्रिय राहून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या आहेत.
दिल्लीतील एनसीआर-27 भागात राहणाऱ्या एक 27 वर्षीय महिला 'द-क्विंट'ला बोलताना म्हणाली की, मला धक्काच बसला, जेव्हा एका अनोळखी व्यक्तीने माझ फोटो पोस्ट करत, मी विक्रीला असल्याचं म्हणत मला टॅग केलं. त्यांनतर मी लगेच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म सोडणे पसंद केले.
महिला पत्रकारांना घाबरवण्यासाठी सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची पद्धत चिंताजनक असल्याचं सांगत, डिटर गिल्डस ऑफ़ इंडिया या संघटनेने सुद्धा या घटनेचा निषेध केला आहे.
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या वेबसाईटवरून ही अॅप तयार करण्यात आली होती, त्या गिटहब नावाच्या वेबसाईटने खुलासा केला आहे. ज्यात ते म्हणतात की, आम्ही या प्रकरणात संबधित वापरकर्त्याचे खाते निलंबित केले आहे. आलेल्या बातम्यांच्या आधारे तपास सुरू केला गेला आहे. तसेच, अशाप्रकारे भेदभाव आणि हिंसेच समर्थन करणे 'गिटहब'च्या धोरणांच उल्लंघन करणार आहे.