Home > News > Good News : 18 वर्षांखालील मुलांना करता येणार लोकलने प्रवास

Good News : 18 वर्षांखालील मुलांना करता येणार लोकलने प्रवास

Good News : 18 वर्षांखालील मुलांना करता येणार लोकलने प्रवास
X

कोरोनाचा ( Coronavirus ) प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यापनुसार रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. आजपासून दसऱ्याच्या मुहूर्तावर 18 वर्षांखालील मुलांना मुंबई लोकल रेल्वे प्रवासाची ( Mumbai local trains ) मुभा देण्यात आली आहे. मात्र, लोकल प्रवासावेळी ( Mumbai local ) पास आणि ओळखपत्रही सोबत असणे आवश्यक असणार आहे. याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वेने तसे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एखाद्या व्यक्तीला काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करायचा असल्यास त्यांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. त्यासाठीही डॉक्टरांकडून प्रमाणपत्र पुरावा म्हणून द्यावा लागेल. हा पुरावा दाखवताच मासिक पास तिकीट खिडक्यांवर उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारच्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, रेल्वे मासिक पास घेण्यासाठी तिकीट खिडक्यांवर पुरावा म्हणून ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. प्रवासावेळी पास आणि ओळखपत्रही सोबत बाळगणे बंधनकारक आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपाठोपाठ कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. मात्र, 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांना लोकल प्रवास करता येत नव्हता. आता दोन डोस घेतलेल्या मुलांना प्रवास करता येणार आहे.

राज्य सरकारने शाळा सुरु केल्यानंतर , 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालयं सुरु होणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांपुढे प्रवासाची मोठी अडचण होती. आता परवानगी मिळाली असल्याने लोकल प्रवास करता येणार आहे.

Updated : 15 Oct 2021 12:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top