…तर कंगनाला मुंबई पोलीस घरातून उचलू शकतात
X
मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात वांद्रे न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा नोंदवला असून जवाब आणि चौकशीसाठी या आधी दोन वेळा दोघींना समन्स बजावला होता मात्र त्या दोघी आल्या नाहीत. आता तिसऱ्यांदा कंगनाने वांद्रे पोलिसांचा समन्स धुडकावून लावला. कंगनाने तिच्या भावाचं लग्न असल्याने येणं शक्य नसल्याचं वकिलामार्फत कळवलं आहे.
तिन समन्स देऊनही जर आरोपी चौकशीसाठी पोलीस स्थानकात उपस्थित न राहिल्यास पोलीस काय कारवाई करतात? असा प्रश्न आम्ही कायदेतज्ज्ञ रमा सरोदे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, "पोलीसांनी न्यायालयाच्या परवानगीने तीन वेळा समन्स देऊनही आरोपी हजर रहात नसेल तर सबंधीत केसचा न्यायालय एकतर्फी निकाल देऊ शकतं. पोलीसांना जर आरोपीला अटक करायचं असेल तर आधी न्यायालयाची परवानगी असणं गरजेचं आहे."
"आरोपी दुसऱ्या राज्यात असेल तर पोलीसांना संबधीत राज्यातील पोलीसांची मदत घेऊनच पुढील कारवाई करावी लागते." कंगना आणि रंगोली यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी चौकशीसाठी कंगनाला २६ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, दोघींनीही चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर, १० नोव्हेंबर रोजी कंगनाला आणि रंगोली हिला ११ नोव्हेंबर रोजी हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंगनानं भावाच्या लग्नाचं कारण पुढे करत चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघींनाही तिसऱ्यांदा समन्स पाठवले.
बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कंगना करत असल्याचे याचिकेत म्हटले होते. कास्टींग डायरेक्टर मुनावर अली उर्फ साहिल सय्यद यांनी ही याचिका दाखल केली होती. समाजमाध्यमांत तसेच टीव्हीवर सगळीकडे बॉलिवूडच्या विरोधात बोलत आहे. ती सतत बॉलिवूड विरोधात माहिती पसरवली जात आहे. कंगनाविरोधात विरोधात दोघांनी वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे आता मुंबई पोलिस कंगना आणि तिच्या बहिणीवर काय कारवाई करतायत याकडे लक्ष आहे.