मोदींची हवा, या फुग्यात कोणी राहू नये; नवनीत राणा
X
मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये, एवढी मोठी यंत्रणा असून 2019 मध्ये एक अपक्ष उमेदवार निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडून गेली होती, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकांची तायरी सुरू आहे. अशात भाजने महायुतीकडून खासदर नवनीत राणा यांना उमेदवारी जहीर केलीये. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्याने चर्चेत आल्या होत्या. अशात आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य केलंय. त्यामुळे राजकीय वर्तृळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मतदानाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत सर्व मतदार आपल्याला बूथवर न्यायचे आहेत. सर्वांनी मतदान केलं पाहिजे. मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये, असं खळबळजनक वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने निवडणूक काळात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप देशभर मोदींच्या नावाने मतं मागत असून देशभरात मोदींची हवा असल्याचं सांगत आहे. मात्र मोदींची हवा असल्याच्या मुद्द्याला नवनीत राणा यांनी छेद दिला आहे. त्यामुळे देशात मोदींची हवा आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय.
ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायत सारखी लढायची आहे. 12 वाजेपर्यंत सर्व मतदार आपल्याला बूथवर न्यायचे आहेत. सर्वांनी मतदान केलं पाहिजे. मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये, एवढी मोठी यंत्रणा असून 2019 मध्ये एक अपक्ष उमेदवार निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडून गेली होती, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केले आहे.
या आधी नवनीत राणा यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला होता.नवनीत राणा जशा भाजपमध्ये आल्या आहेत त्याच पद्धतीने रवी राणांना देखील त्या घेऊन येतील, असं बावनकुळेंनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी बाहेरच्या व्यक्तींनी नवरा-बायकोमध्ये न बोललेलं बरं असा इशारा दिला होता.