Home > News > "कुठल्याही क्षणी सरकार पडेल..." श्वेता महाले यांचा दावा

"कुठल्याही क्षणी सरकार पडेल..." श्वेता महाले यांचा दावा

या सरकारला कायम या दोन वर्षांमध्ये भीती राहिलेली आहे कुठल्याही क्षणी आपले सरकार पडू शकतं. असं म्हणत आमदार श्वेता महाले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल..

कुठल्याही क्षणी सरकार पडेल... श्वेता महाले यांचा दावा
X

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्याचा घाट घातला होता.वास्तविकता समृद्धी महामार्गाचे काम हे अद्याप पर्यंत पूर्णत्वास गेलेले नसतांना सुद्धा हे सरकार उद्घाटन करण्याच्या मनस्थितीत होतं. या सरकारला कायम या दोन वर्षांमध्ये भीती राहिलेली आहे कुठल्याही क्षणी आपले सरकार पडू शकतं. असं म्हणत आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्या काल चिखली या ठिकाणी आयोजित इफ्तार पार्टीत सहभागी झाल्या होत्या त्यावेळी त्या बोलत होत्या.

आज ज्या पद्धतीने या सरकारचे दोन मंत्री गजाआड असतांना त्यांना या ठिकाणी प्रचंड भीती आहे की कुठल्याही क्षणी भ्रष्टाचाराचे विषय घेऊन भारतीय जनता पार्टी जनतवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. अशा वेळेला आपलं सरकार पडलं तर हे एवढ मोठ भव्य दिव्य काम जे फडणवीस साहेबांनी केलेल होत त्यांच्या कार्यकाळात त्याचे श्रेय आपल्याला घेता येणार नाही.. या मानसिकतेतून त्यांना लोकांच्या जिवापेक्षा स्वतः ला श्रेय घेण्यामध्ये मोठेपण दिसत होतं.. त्या मानसिकतेतून त्यांनी उद्घाटन करण्याचा घाट घातला... बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा या गावा जवळ समृद्धी महामार्गा वर मोठा अपघात घडला.. सुदैवाने या ठिकाणी जिवितहानी झाली नाही.. परंतु जर एखादी जीवित हानी या ठिकाणी झाली असती तर त्याला सर्वस्वी जबाबदार ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे असते. अस म्हणत त्यांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावरून उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

Updated : 29 April 2022 12:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top